spot_img

श्रीमद् भागवत कथा व हरिनाम सप्ताहास प्रारंभ ,विनायक नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजन

श्रीमद् भागवत कथा व हरिनाम सप्ताहास प्रारंभ

■विनायक नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजन

■मिररवृत्त
■अमरावत

राधानगर स्थित विनायक नगर, सदिच्छा कॉलनी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून एक जानेवारी रोजी मोठ्या भक्तीभावात सप्ताहास प्रारंभ झाला.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एक जानेवारी रोजी सकाळी पुंडलिकराव मानकर व सौ रंजना मानकर यांच्या हस्ते अभिषेक आणि कलश स्थापना करण्यात आली. 8 जानेवारीपर्यंत दुपारी 1 ते 5 या वेळात वनदेवी आश्रम, तीनखेडा येथील प.पू दीदी माँ साध्वी सुश्री अर्पिता मानस भारतीजी भागवत कथा वाचन करणार आहे. तसेच दररोज सायंकाळी ६.30 ते 7 या वेळात हरिपाठ होणार आहे. दररोज विविध भजन मंडळी आपला भजनाचा कार्यक्रम सादर करणार असून रविवार दिनांक 7 रोजी दुपारी 4 वाजता श्रीमद् भागवत ग्रंथ मिरवणूक व पालखी काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 7वाजता ह. भ. प. रामचंद्र महाराज काळबांडे सावरगाव यांचे कीर्तन तर सोमवार दिनांक 8 रोजी 10 ते 12 या वेळात काल्याचे किर्तन होईल.दुपारी 12 वाजता आमदार सुलभाताई घोडके यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. आयोजित सर्व कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सदाशिवराव चिंचे, वामनराव खरबडे, विजय भुयार ,बबनराव जवंजाळ ,ओंकार बोबडे ,विश्वासराव गांजरे, सुनील बोदडे, प्रमोद महल्ले यांनी केले आहे.

◆६ जानेवारी रोजी आरोग्य तपासणी शिबिर◆
भागवत सप्ताहाचे औचित्य साधून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट तर्फे 6 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 12 या वेळात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात डॉक्टर परीक्षित ठाकरे ,डॉक्टर अक्षय चांदूरकर, डॉक्टर भूषण सगणे ,डॉक्टर प्रणित काकडे ,डॉक्टर प्रतीक चिरडे आदी नामवंत डॉक्टर सेवा देत नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!