spot_img

टेंभा येथे भीमा-कोरेगाव शौर्य दिनी ध्वजारोहण व मानवंदना ,उपासिका व महिला भजनी मंडळातील भगिनी यांना वस्त्रदान

टेंभा येथे भीमा-कोरेगाव शौर्य दिनी ध्वजारोहण व मानवंदना

■उपासिका व महिला भजनी मंडळातील भगिनी यांना वस्त्रदान

■मिररवृत्त

■टेंभा

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्य टेंभा येथे सोमवारी ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली.माजी जि.प.सदस्य प्रकाश साबळे यांच्या पुढाकाराने सातत्याने नऊ वर्षांपासून या मानवंदना कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात येत असून परिसरातील अनुयायी यांची मोठ्या प्रमाणात याठिकाणी उपस्थिती असते.यावेळी सहभागी उपासिका व भजन मंडळातील भगिनींना वस्त्र दान करण्यात आले.
या मानवंदना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश साबळे हे होते तर इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा.कुसुमेन्द्र सोनटक्के प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सोबतच विचारपीठावर सरपंचा कांता वाहने,गणेशराव कडू,माजी उपसरपंच अनिल कडू,माजी सरपंच सुरेशराव मोरे,संजय चोपडे,सुनील तायडे,अक्षय सरोदे,गजानन इसळ,अंकुश चोपडे,अमोल तायडे,मिलिंद चोपडे व समता सैनिक दलाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कुसुमेन्द्र सोनटक्के यांनी भीमा कोरेगाव येथील शौर्यगाथा उपस्थित नागरिकांसमोर मांडली.१ जानेवारी १८१८ मध्ये पाचशे महार सैनिकांनी मिळविलेला विजय हा आपल्या शौर्याचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले.प्रकाश साबळे यांनी सुद्धा या शौर्याचा इतिहास प्रत्येकाने वाचवा तसेच हा दिवस आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून सर्वांनी आनंदाने साजरा करावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांनी ध्वजारोहण करून मानवंदना दिली. यावेळी परिसरातील अनुयायी, नागरिक, उपासक,उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!