जिजाऊ कमर्शियल क्रेडिट को-ऑप बँक निवडणूक
■सहकार पॅनेलने मिळविली एकहाती सत्ता
■१५ पैकी १० जागांवर विजय
■मिररवृत्त
■अमरावती
आर्थिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या पश्चिम विदर्भातील जिजाऊ कमर्शियल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या १५ संचालकांसाठी रविवारी निवडणूक संपन्न झाली. आज सोमवारी झालेल्या मतमोजणीत सहकार पॅनलचे दहा तर परिवर्तन पॅनलचे पाच संचालक निवडून आले. निवडणूकी दरम्यान झालेल्या आरोप प्रत्यारोपामध्ये बँकेच्या भागधारकांनी सर्व आरोपाना • फेटाळत सहकार पॅनलच्या हाती पुन्हा सत्ता सोपवित अविनाश कोठाळे व राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वातील पॅनलला निवडून दिले.
उद्योजक स्टार्टअप सारख्या लघुउद्योगांना आर्थिक सहाय्य करणारी सर्वसामान्यांची बँक म्हणून जिजाऊ बैंक परिचित आहे. जिजाऊ बँकेच्या १५ संचालका करिता सहकार व परिवर्तन अशा दोन मुख्य पॅनल मध्ये अटीतटीची लढत संपन्न होऊन या निवडणूकीत सहकार पॅनलचे अविनाश कोठाळे, नितीन डहाके, प्रा अनिल बंड, डॉ गौरव विधळे, बबनराव आवारे, श्रीकांत टेकाडे, प्रदीप चौधरी, पल्लवी बारब्दे, सुनील चाफले, स्वप्निल वावरे हे दहा उमेदवार तर परिवर्तन पॅनलचे अरविंद गावडे, अनिल टाले, प्रशांत गावंडे, राजेंद्र अढाऊ, वैशाली गुडधे हे पांच उमेदवार विजयी झाले. यादरम्यान अनिल टाले यांच्या विजयानंतर आक्षेप आल्याने फेरमोजणी झाली असता टाले यांच्या मतात तीन मताची वाढ होऊन ते फेर मोजणीत विजयी ठरले.
■लोक विश्वासाचा विजय- अविनाश काठोळे■
जिजाऊ सहकार पॅनलचा जो विजय आहे हा लोक विश्वासाचा व निःस्वार्थी लोकांचा विजय आहे. लोकांनी जी भरभरून मते दिली. ते पॅनल प्रमुख राजेंद्र, जाधव यांच्या प्रति असलेल्या विश्वासातून हा विजय संपादन झाला. जिजाऊ बँकेत कुठलाच घोळ नाही. हे सिध्द झाले. आमच्या विजयात विनोद कोरडे यांचा सहभाग असुन निवडून आलेल्या सर्व संचालकांचे अभीनंदन करत असल्याचे म्हटले.
■सहकार पॅनलच्या विजयात विनोद कोरडेंची भूमीका महत्त्वाची■
जिजाऊ बकेच्या निवडणूकीत विनोद कोरडे हे सहकार पॅनलचे उमेदवार होते. या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला असला तरी पॅनलच्या विजयात त्यांची भूमीका अत्यंत महत्त्वाची ठरली. ग्रामिण भागात सर्वाधिक मतदान चांदुरबाजार तालुक्यात झाले. ३०२ झालेल्या मतदानातून कोरडे यांची मेहनत प्रामुख्याने चर्चेत आली. पॅनलच्या यशात विनोद कोरडे व प्रहार कार्यकर्त्यांची मेहनत महत्वाची ठरली. ही बाब अविनाश काठोळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. विनोद कोरडे आज संचालक नसले तरी संचालक पदाची माळ त्यांच्या गळयात निश्चीतच पडणार.
■ईश्वर वैद्यचे नियोजनही ठरले महत्वाचे■
जिजाऊ बँकेच्या या निवडणूकीत सहकार पॅनलच्या अनेकांनी महत्वपूर्ण भूमीका निभावल्या. त्यात ईश्वर वैद्य यांची भूमीका अत्यंत महत्वाची होती. अचलपूर, दर्यापूर, अंजनगावं सह शहरात त्यांनी पॅनलच्या विजयाचे नियोजन अत्यंत प्रभावीपणे केले.
■परिवर्तन पॅनलचे पाच उमेदवार विजयी■
जिजाऊ बँकेच्या निवडणूकीत (परिवर्तन पॅनलचे पांच उमदेवार झाले. अरविंद गावंडे, अनिल टाले, प्रशांत गावंडे, राजेंद्र अढाऊ, वैशाली गुडधे हे पांच उमेदवार विजयी झाले