spot_img

चांदस वाठोडा येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव साजरा,ह.भ.प कडू महाराज यांचे काल्याचे कीर्तन

चांदस वाठोडा येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव साजरा

■ह.भ.प कडू महाराज यांचे काल्याचे कीर्तन

■मिररवृत्त
■वरुड

निष्काम कर्मयोगी,संत श्री.गाडगेबाबा यांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्य चांदस वाठोडा येथील डॉ.नरहरी निंबुरकर यांच्या निवासस्थानी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांच्या वतीने संत गाडगेबाबा यांना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी गावातून स्वच्छता दिंडी काढण्यात आली होती. गावकऱ्यांना दिंडीच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व देखील पटवून देण्यात आले.
ह.भ.प कडू महाराज घोराड यांचे गोपालकाल्याचे कीर्तन पार पडले. कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील गावकऱ्यांना देण्यात आला.संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा अवलंब करा, शिक्षणाला महत्व द्या, महापुरुषांचे विचार अंमलात आणा असा महत्वपूर्ण संदेश कडू महाराज यांनी आपल्या कीर्तनातून दिला. गोपाळकाला किर्तनानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आला.यावेळी गावातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाला परिसरातील असंख्य अनुयायी आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय निंबुरकर, नरेश निंबुरकर, आशिष निंबुरकर, दिनेश गलफट,अनिल चोबितकर,दिपक देशमुख, अतुल सोनटक्के,अक्षय निंबुरकर, शरद पारधी,यश निंबुरकरशैलेष काटकर,रोशन खाडे, लखन ठाकरे,मंगेश खंडेझोड, राजु डांगे ,पार्थ चोबितकर, ओम चोबितकर, गौरव चोबितकर व समस्त गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!