spot_img

अमरावती जिल्ह्याचे वैभव असलेले कन्याकुमारी शिलास्मारकाचे शिल्पकार एकनाथजी रानडे यांच्या जयंतीचा शासनाला पडला विसर

अमरावती जिल्ह्याचे वैभव असलेले कन्याकुमारी शिलास्मारकाचे शिल्पकार एकनाथजी रानडे यांच्या जयंतीचा शासनाला पडला विसर

◆मिररवृत्त
◆सुरज सहारे
◆टिमटाला

निवेदने, तक्रारी, मागणी व प्रसिद्धीमाध्यमांद्वारे विनंती करूनही अमरावती जिल्ह्याचे वैभव असलेले कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिलास्मारकाचे शिल्पकार श्रध्देय एकनाथजी रानडे यांची जयंती शासनस्तरावर साजरी करण्याच्या मागणीकडे जिल्ह्यातील जनप्रतिनिधींप्रमाणेच प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून शासनाला सुद्धा याचा विसर पडला आहे.
सविस्तर वृत्त असे की, कन्याकुमारी येथील जगप्रसिद्ध स्वामी विवेकानंद शिलास्मारकाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदीसाहेब यांना संघशाखेत असतांना देशसेवेचे व राष्ट्रनिर्माणाचे धडे देणारे, स्वामी विवेकानंदांचे केवळ मूर्त स्वरूपातच स्मारक न उभारता संपूर्ण देशात विवेकानंद केंद्राची स्थापना करून आरोग्यसेवेचा व शिक्षणसेवेचा ध्यास बाळगणारे श्रध्देय एकनाथजी रानडे यांचा जन्म दि. १९ नोव्हेंबर १९१४ रोजी केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल साहेब यांचे खासदार आदर्श दत्तक ग्राम, अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टिमटाळा येथे झाला होता. ही बाब संपूर्ण अमरावती जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आणि जिल्ह्याचे नाव उंचावणारी असली तरी मात्र त्यांच्या नावाचा किंवा त्यांच्या जन्मगावाचा प्रशासकीय कार्यालयामध्ये साधा उल्लेखही नाही. पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी श्रध्देय एकनाथजी रानडे यांची जयंती शासनस्तरावर साजरी करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणेच अमरावती जिल्ह्याचे खासदार, आमदार यांनाही गावकऱ्यांच्या वतीने निवेदने सादर केली आहेत. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री साहेब यांनाही ईमेल द्वारे निवेदन सादर केले आहे त्यावर मा. मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे आपला ईमेल पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्याचा प्रतिसाद मिळाला मात्र अमरावती जिल्ह्याचे वैभव असलेल्या श्रध्देय एकनाथजी रानडे यांच्या शासनस्तरावर जयंती साजरी करण्यासंदर्भात अमरावती जिल्ह्यातील खासदारांप्रमाणेच आमदारांनाही निवेदने पाठवून मात्र त्यांनी याबाबत कुठलाच प्रतिसाद दिला नाही तसेच लोकसभेत किंवा विधानसभेत तशी मागणीही केली नसल्याचे श्रीपाल सहारे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे श्रध्देय एकनाथजी रानडे यांची जयंती शासनस्तरावर साजरी करण्यात यावी या मागणीपूर्ण निवेदनाचा शासनाला विसर पडला की जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे असा प्रश्नही ग्रामस्थांचा मनात घर करून आहे?

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!