spot_img

१ जानेवारीला सायन्सकोर येथे ऐतिहासिक,विश्वविक्रमी मानवंदना भीमाकोरेगाव शौर्य दिनानिमित्य भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन,विदेशातील पाहुण्यांचीही उपस्थिती

१ जानेवारीला सायन्सकोर येथे ऐतिहासिक,विश्वविक्रमी मानवंदना

भीमाकोरेगाव शौर्य दिनानिमित्य भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन,विदेशातील पाहुण्यांचीही उपस्थिती

कैलाश मोरे यांची पत्रपरिषदेत माहिती.

■मिररवृत्त

■अमरावती

१,२ आणि ३ जानेवारी २०२४ ला सायन्सस्कोर मैदान अमरावती येथे ऐतिहासिक विश्वविक्रमी मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी कार्यक्रमाला विशेष आकर्षण म्हणून १८९८ च्या शौर्य गाथेच्या लढाईचे सरसेनापती सिध्दनाक महार यांचे १२ वे वंशज मिलींद इनामदार (कळंबी) मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.अयोजनाचे हे बारावे वर्ष असून ५० बुलेटवरून माजी सैनिक याठिकाणी मानवंदना देणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने देखील आयोजकांनी विशेष खबरदारी घेतली आहे.अशी माहिती कैलाश मोरे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
अखिल भारतीय भिक्खु संघ शाखा अमरावती येथील भंतेगण या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. मानवंदना कार्यक्रमाला आनंदराज आंबेडकर यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. सुप्रसिध्द गायक प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी, इजि. पवन दवंडे, अर्चना मोहिते, अशोक निकाळजे, कुणाल वराळे, अजय देहाडे, सुशिला गांगुर्डे, पुरूषोत्तम खांडेकर, योगेश पवार, अरविंद मोहिते (मुंबई) उपस्थित राहून बुध्द भिम गितांचा नॉनस्टॉप कार्यक्रम प्रस्तुत करण्यात येणार आहे. १ जानेवारीला ४.०० वाजता समता सैनिक दलचे रवि नागले, देवेंद्र खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व माजी सैनिकांव्दारा सुभेदार अविनाश गायकवाड यांच्या नेतृत्वात सैनिक फेडरेशन च्या वतीने ५० बुलेट वरून खुल्या वाहनाव्दारे परेड व बिगुल च्या मध्यामातून मानवंदना देण्यात येणार आहे.
दिनांक २ जानेवारी ला दुपारी ४.०० वाजता १००० बुध्द विहार समित्यांच्या सत्कार सोहळा तसेच मान्यवरांचा सुध्दा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्या सोहळ्यात आनंदराज आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी अजय देहाडे, सुशिला गांगुर्डे, पुरुषोत्तम खांडेकर, योगेश पवार, अरिविद मोहिते, अर्चना मोहिते यांच्याव्दारे २८ नॉनस्टॉप भिमगितांचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक ३ जानेवारीला सकाळी ९.०० वाजता सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करीता विविध समित्या स्थापन करून सर्वांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.उपस्थित अनुयायांची राहण्याची व जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. पत्रपरिषदेत त्रिवेणी मकुलकर, कांचन ,सरला इंगळे, कैलास मोरे, वसंतराव गवई, धनंजय गुलदेवकर, विलास इंगळे, पूजा इंगळे, वंदना बनसोड,संजय बनसोड, किशोर सरदार, विशाल मकेश्वर, कपिल धवणे, नितीन शिरसाठ, ऍड. प्रभाकर वानखडे, बबिता सोनोने, अर्चना रक्षे, नितीन राऊत, राजबंधु बनसोड यांची उपस्थिती होती.

■पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून यावे■

मानवंदना कार्यक्रमाला येतांना अनुयायांनी पांढरे शुभ्रवस्त्र परिधान करून यावे अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

■तीन प्रवेश द्वार■

सायन्सकोर मैदान याठिकाणी मानवंदना कार्यक्रमासाठी तीन प्रवेशद्वार असून प्रवेशद्वार क्र.१ (रुख्मिनी नगर)मधून पायदळ येणारे अनुयायी तसेच दुचाकी वाहणांची व्यवस्था करण्यात आली आहे तर प्रवेशद्वार क्र.२ मधून पायदळ येणाऱ्या अनुयायांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे तर प्रवेशद्वार क्र.३ मधून महत्वाच्या व्यक्तींसाठी तसेच पाहुण्यांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!