spot_img

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत एक दिवसीय कार्यशाळा , मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांची उपस्थिती

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत एक दिवसीय कार्यशाळा

■ मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांची उपस्थिती

■मिररवृत्त
■अमरावती

व्हीएसटीएफ आदर्श शाळा उपक्रम टप्पा १ व २ अंतर्गत झालेल्या कामाचे मुल्यांकन करणेच्या उद्देशाने गुरुवारी प्रबोधिनी अमरावती येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांचे अध्यक्षतेखाली एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
अविष्यांत पंडा यांनी कार्यशाळेला संबोधित करतांना बदलत्या शिक्षण पद्धतीत शिक्षणाच्या गुणवत्तेवर भर देणे, आधुनिक शिक्षण प्रणालीचा वापर करीत डिजिटल रिसोर्सेसचा योग्य वापर करणे, इत्यादी वर भाष्य केले. तसेच मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्हीएसटीएफ अमरावती आदर्श शाळा यशोगाथा व महाराष्ट्रातील व्हीएसटीएफ आदर्श शाळा उपक्रम पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात व्हीएसटीएफ चे मिशन व्यवस्थापक प्रफुल रंगारी, मिशन सहयोगी निकेश आमने यांचे तसेच नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टॅडिंग अँड न्युमरसी – निपुण भारत मिशनचे तामगाडगे यांचे मार्गदर्शनात विविध शैक्षणिक विषयांचे मुल्यांकन करणेचे उद्देशाने सखोल चर्चा करण्यात आली.यावेळी उप-शिक्षणाधिकारी(प्राथमिक) गजला खान, जिल्हा परिषद अमरावती यांचे उपस्थिती होती तर कार्यशाळेला अमरावती तसेच नागपूर विभागातील व्हीएसटीएफ आदर्श शाळा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच जिल्हा कार्यकारी व्हीएसटीएफ उपस्थित होते.
कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता व्हीएसटीएफचे निखिलेश यादव (अमरावती),प्रशांत कारमोरे(चंद्रपूर व गडचीरोली),अर्चना कुऱ्हे
(यवतमाळ),माधुरी सरोदे (अकोला),प्रवीण पिंजरकर(नागपुर), प्रवीण कुऱ्हे(वर्धा),वासुदेव डोने(वाशीम व बुलढाणा) यांनी अथक परिश्रम घेतले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!