spot_img

६७ पैकी ५८ श्वानांना जीवदान, ९ श्वानांचा मृत्यू ,प्राणीप्रेमी वसा संस्थेची कामगिरी

६७ पैकी ५८ श्वानांना जीवदान, ९ श्वानांचा मृत्यू

◆प्राणीप्रेमी वसा संस्थेची कामगिरी

◆मिररवृत्त

◆अमरावती

जखमी प्राण्यांच्या वेदनांवर फुंकर मारणार्या वसा संस्थेच्या पदाधिकार्यांनी रेस्क्यू करून आणलेल्या 67 श्वानांवर उपचार केलेत. परंतू किमोथेरपी दरम्यान 9 श्वानांचा मृत्यू झाला. तर इतर 58 श्वानांना जीवदान मिळाले आहे. पूर्णपणे बरे झालेल्या या श्वानांना त्यांच्या मूळ जागी सोडून देण्यात आले आहे. या श्वानांवर किमोथेरपी सुरु करण्याआधी आणि नंतर त्यांच्या रक्ताच्या तपासण्या होतात, त्यानंतर त्यांच्या उपचाराच्या पद्धती ठरविल्या जातात असे वसाचे व्हेटर्नरी सर्जन डॉ. सुमित वैद्य यांनी सांगितले.

वसा संस्थेला जखमी प्राण्यांच्या मदत करिता दिवस भरातून 30 ते 40 रेस्क्यू कॉल्स येतात. यामध्ये प्रामुख्याने अपघात जखमी झालेले श्वान, मांजरी, गायी, म्हशी, डुक्कर, घोडे यांचा समावेश असतो. लहान प्राण्यांच्या वाहतूकीसाठी लहान रुग्णवाहिकेचीही व्यवस्था आहे. मात्र मोठ्या प्राण्यांच्या वाहतुकीचा मोठा प्रश्न आमच्या समोर आला आहे. सोबतच दररोज जखमी प्राण्यांच्या केसेस अमरावती शहरात वाढत आहेत. त्यामुळे या प्राण्यांना ठेवण्याच्या व्यवस्थेवर प्रभाव पडत आहे. वसा सेंटरवर आता एक्सरे मशीन, रक्त तपासणी मशीन आणि गॅस अनेस्थेशियाची सुविधा उपलब्ध आहे. प्राणी प्रेमी नागरिकांनी पुढाकार घेऊन या मुक्या जिवांसाठी मदत करणे अपेक्षीत आहे, अशी माहिती वसा संस्थेचे सचिव गणेश अकर्ते यांनी दिली.

●किमोथेरपी ने वाचविले 58 श्वानांचे प्राण●
या वर्षी शहरभरातून वसा संस्थेच्या अनिमल्स रेस्क्यु टीमने किमोथेरपीतून 58 श्वानांचे प्राण वाचविले. यामध्ये 18 नर तर 49 मादी श्वानांचा समावेश होता. यामध्ये काही श्वानांना म्यामेरी ग्ल्यांड ट्युमर झाले होते, तर काही श्वानांना ट्रान्समर्सिबल वेनेरल ट्युमर झाला होता. श्री गोरक्षण व्हेर्टनरी हॉस्पिटलमध्ये डॉ. दीपक कऱ्हे आणि डॉ. सुमित वैद्य यांनी या श्वानांना किमोथेरपी दिली. वसा अनिमल रेस्क्यु सेंटरमध्ये त्यांची योग्य ती काळजी घेतली गेली. ट्युमर असलेल्या श्वांनांचे ऑपरेशन केले गेले.

●कर्करोग बरा करण्यासाठी केमोथेरपीच प्रभावी●
कर्करोग बरा करण्यासाठी केमोथेरपी हा एकमेव प्रभावी उपचार आहे. रस्त्यावरून रेस्क्यू करून आणलेल्या कॅन्सर ग्रस्त श्वानांना दुय्यम संसर्गाची भीती असते. कर्करोगामुळे त्यांचे वजन कमी होते किंवा शरीरात रक्ताची कमतरता असते. अशा परिस्थितीत उपचारांपूर्वी त्यांना चांगले अन्न दिले जाते, नंतर त्यांचे रक्त तपासले जाते आणि त्यांच्यावर केमोथेरपी केली जाते. कर्करोगविरोधी औषधांमुळे काही श्वानांमध्ये केस गळणे आणि कमी खाणे अशी लक्षणे दिसतात.
असे श्री गोरक्षण पशुवैद्यकीय रुग्णालयाचे वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक कर्हे यांनी सांगितले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!