spot_img

प्रधानमत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय इंडिया आघाडी देऊ शकते मोदींना सक्षम पर्याय,शरद पवारांचा दावा

प्रधानमत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय इंडिया आघाडी देऊ शकते मोदींना सक्षम पर्याय,शरद पवारांचा दावा

●आघाडीच्या पुढच्या बैठकीत जागावाटपावर होईल

●मिररवृत्त

●अमरावती

तीन राज्यांतील निवडणूक निकाल आमच्यासाठी समाधानकारक नाहीत. मात्र त्यामुळे आम्ही नाउमेदही झालो नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत ही उणीव भरून काढण्यासाठी जनता इंडिया आघाडीला मदत करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी व्यक्त केला. ‘मोदींविरोधात आघाडीकडे चेहरा नाही,’ अशी टीका केली जात आहे. या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘१९७७ च्या निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी कुणाचाही चेहरा समोर न करता आम्ही लढलो होतो. निवडणूक निकालानंतर न करता आम्ही लढलो होतो. निवडणूक निकालानंतर सर्वसंमतीने मोरारजी देसाई यांना पंतप्रधान म्हणून निवडले होते. आताही चेहरा समोर न करता इंडिया आघाडी (मोदींना) सक्षम पर्याय देऊ शकते,’ असा विश्वास पवार यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.

■५ लाखांच्या पुरस्कारात पवारांची १५ लाख रु.भर■

व्याजातून दरवर्षी शेतकरी महिलेचा सन्मान करणार पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृत्यर्थ पहिला पुरस्कार शरद पवार यांना देण्यात आला. ५ लाख रुपये, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पवारांनी त्यात १५ लाख रुपयांची भर टाकली. आता २० लाखांच्या व्याजातून दरवर्षी विदर्भातील उत्कृष्ट शेतकरी महिलेस पुरस्कार देण्याची घोषणा पवारांनी केली.
या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, दुर्दैवाने आज राजकारणाचा अर्थ सत्ताकारण झाला आहे. पण राजकारण हेच समाजकारण समजून कृषीसह इतर क्षेत्रातील गुणवत्ताधारकांच्या पाठीशी पक्षीय अभिनिवेश न बाळगता उभे राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

■बाबरी पाडल्याची जबाबदारी घेणारा बाळासाहेब ठाकरेंचा एकच पक्ष होता’सेनेचे कौतुक, भाजपला टोला■

अयोध्येत राम मंदिर झाल्याचा आनंद आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी आजवर अनेकांनी योगदान दिले. बाळासाहेबांच्या तोंडूनही मंदिराबाबत शिवसेनेची भूमिका मी एकली होती. बाबरी पाडल्याची जबाबदारी फक्त ठाकरेंनी घेतली होती. त्या वेळी तिथे फक्त त्यांचा एकच पक्ष होता, असा टोला शरद पवारांनी भाजपचे नाव न घेता लगावला.

■मंदिराचे राजकारण की व्यवसाय?■

‘राम मंदिराच्या नावावर भाजप राजकारण करतेय का?’ या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, ‘ते या विषयावर राजकारण करताहेत की व्यवसाय मला माहीत नाही. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मला अद्याप तरी निमंत्रण अालेले नाही. मी कधी मंदिरात जात नाही. मंदिरात जाणे ही व्यक्तिगत बाब आहे. त्यासाठी निमंत्रणाची गरज आहे असे मला तरी वाटत नाही.

■खरगेंच्या नावास अप्रत्यक्ष विरोध■

इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव ममता बॅनर्जीनी पुढे केले आहे. असे असताना ‘चेहऱ्याशिवाय निवडणूक लढवण्याचा’ शरद पवारांनी दिलेला पर्याय हा खरगेंच्या नावाला विरोध असल्याचे मानले जाते. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित’ला आघाडीत घेण्याबाबत खरगे यांच्याशी चर्चा झाल्याचे पवार म्हणाले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!