spot_img

ठाकरेंच्या 23 जागांच्या मागणीवर काँग्रेसची हरकत ,तुम्हाला एवढ्या जागा दिल्या तर आम्ही लढायचे कुठे?संजय निरुपम यांचा सवाल

ठाकरेंच्या 23 जागांच्या मागणीवर काँग्रेसची हरकत

●तुम्हाला एवढ्या जागा दिल्या तर आम्ही लढायचे कुठे?संजय निरुपम यांचा सवाल

●मिररवृत्त

●मुंबई

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी केलेली 23 जागांची मागणी काँग्रेसने फेटाळल्याची माहिती आहे. ठाकरे गटाला एवढ्या जागा दिल्या तर आम्ही लढावे कुठे? असा सवाल काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील जागा वाटपाचा तिढा अधिकच क्लिष्ट होण्याची शक्यता आहे.काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला 23 जागा देण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. शिवसेना व राष्ट्रवादीसोबत सध्या किती मते आहेत? हे कुणालाही माहिती नाही पण काँगेसकडे किती मते आहेत हे सर्वांना ठावूक आहे. आमच्याकडेही नेते व कार्यकर्ते आहेत. त्यामुळे तुम्ही एकत्र बसून जागा वाटपावर निर्णय घ्या. त्यात आपल्या सर्वांचेच भले आहे, असे ते म्हणालेत.
संजय निरुपम म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेना- राष्ट्रवादी – काँग्रेस व कदाचित वंचित बहुजन आघाडी यांची एकत्रित आघाडी होईल. त्यात एखाद्या घटक पक्षाने जास्त जागांचा आग्रह धरला तर त्यामुळे सर्वांचेच नुकसान होईल. आपण सर्वजण एकत्र येवून चर्चा करू व ज्या जागा निवडून येतील त्या एकमेकांना वाटप करू.

■’वंचित’च्या मुद्यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय■

वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्याचा निर्णय
वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत येण्यासंबंधी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे आमचे नेतृत्व त्यावर नक्कीच विचार करेल. 12 जागा तुम्ही घेणार मग आम्ही काय करणार? भाजपाला रोखायचे असेल तर प्रत्येक पक्षाला चर्चा करावी लागेल.संजय राऊत यांनी 23 जागा मागितल्या आहेत. सर्व जागा तुम्ही घेणार मग आम्ही कुठे लढणार? असा सवाल निरुपम यांनी यासंबंधी उपस्थित केला.
काँग्रेस मुंबई उत्तर पश्चिम जागेवर केव्हाही तडजोड करणार
नाही. ही जागा काँग्रेसची आहे. तिथे काँग्रेसचे प्राबल्य आहे.
त्यामुळे ही जागा आम्ही सोडणार नाही.मुंबईत राष्ट्रवादीला जनाधार नाही. त्यामुळे तेथील 6 जागांचे शिवसेना व काँग्रेस या 2 पक्षांत प्रत्येकी 3 जागा विभागल्या जाव्यात असे आमचे मत आहे, असे संजय निरुपम म्हणाले.

■ठाकरेंनी घेतली होती काँग्रेस श्रेष्ठींची भेट■

इंडिया आघाडीची काही दिवसांपूर्वी दिल्लीत एक बैठक झाली होती. या बैठकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सोनिया व राहुल गांधी यांची भेट घेऊन जागा वाटपाच्या मुद्यावर चर्चा केली होती. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आपला पक्ष 23 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला होता. पण त्यावेळी त्यांनी दोन्ही काँग्रेस किती जागा लढवणार हे स्पष्ट केले नव्हते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!