spot_img

भीषण अपघातात दोन सख्ख्या बहिणींसह तीन ठार,पाच जखमी,नांदुरा किरक्टे येथील वळणावर घडली घटना

लग्नात जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

■भीषण अपघातात दोन सख्ख्या बहिणींसह तीन ठार,पाच जखमी

■नांदुरा किरक्टे येथील वळणावर घडली घटना

■मिररवृत्त
■अमरावती

अमरावती येथील स्वकीयांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित जाण्याकरिता निघालेल्या कुटुंबाच्या ऑटोला भरधाव ट्रकने जबर धडक दिल्याने या अपघातात दोन सख्ख्या बहिणींसह तीन जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान नांदुरा किरक्टे गावाच्या वळणावर घडली. घटनेत पाच जण गंभीर जखमी असून जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
घटनेची सविस्तर हकीकत अशी की, चिंचोली काळे येथील दोन कुटुंबातील आठ सदस्य ऑटो क्र.एम एच २७,पी.३४१० ने चिंचोली येथून चांदुर बाजार मार्गे अमरावती येथील लुंगे लॉन मध्ये येत असतांना सायंकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रक क्र.एम.एच ०४ जे.व्ही.२१०७ ने नांदुरा किरक्टे गावाच्या वळणावर जबर धडक दिली. यामध्ये ऑटो मधील प्रज्ञा सहदेवराव वाकोडे (१९) पद्माकर देविदास दांडगे (५०) यांचा जागीच मृत्यू झाला तर पूजा सहदेवराव वाकोडे (१६) रा.सर्व चिंचोली काळे हीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेमध्ये करुणा साहेबराव वाकोडे ( १७),फुलवंती सहदेवराव वाकोडे (४०),सहदेव किसनराव वाकोडे(५२),रंजिता सहदेव वाकोडे (४०)श्यामराव किसन वाकोडे (५५) हे पाच जण गंभीर जखमी आहेत.
अपघात घडताच घटनास्थळी एकच गर्दी जमली होती. उपस्थित गावकऱ्यांनी तातडीने पोलीस आणि रुग्णवाहिकेला घटनास्थळी पाचारण केले.मात्र परिस्थिती बघता गावकऱ्यांनी खासगी वाहनाद्वारे जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वलगाव पोलिसांनी याबाबत घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास करीत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!