spot_img

तरुणांनी श्रीरामांचा आदर्श घ्यावा-काजल हिंदुस्थानी ,नांदगाव पेठ येथे पार पडली विशाल धर्मसभा

तरुणांनी श्रीरामांचा आदर्श घ्यावा-काजल हिंदुस्थानी

■नांदगाव पेठ येथे पार पडली विशाल धर्मसभा

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

हिंदूविरोधी मानसिकता असणाऱ्या व चित्रपटातील खानावळ समजल्या जाणाऱ्या नायकांचा आदर्श आजकालच्या तरुणांमध्ये दिसून येत असल्यामुळे हिंदूच हिंदूविरोधात उभा ठाकतोय त्यामुळे या तरुणांनी श्रीरामाचा आदर्श घेऊन हिंदू संस्कृतीचे जतन करावे असे आवाहन प्रमुख वक्ता काजल हिंदुस्थानी यांनी नांदगाव पेठ मधील विशाल धर्मसभेत केले.सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक स्थित ग्रामपंचायत पटांगणात विहिप व बजरंग दल च्या वतीने या धर्मसभेचे आयोजन केले होते.
गीताजयंती व शौर्य दिवसाच्या अनुशंगाने नांदगाव पेठ येथील ग्रामपंचायत पटांगणात या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या धर्मसभेच्या व्यासपिठावर काजल हिंदुस्थानी या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या तर गोरक्षक नेहा पटेल व भक्ती देशमुख या सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होत्या.सोबतच शालीकराम महाराज खेडकर,अजितपाल मोंगा, सिद्धू सोळंकी, चेतन वाटणकर,प्रेमानंद शर्मा, प्रमोद गडरेल,विलास हळवे यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रारंभी अयोध्या येथून आलेल्या कलशयात्रेचे धर्मसभेला सुरुवात झाली.संतोष गहरवार यांनी प्रस्तविकेमधून धर्मसभेबाबत माहिती दिली.
यानंतर गोरक्षक नेहा पटेल यांनी गोसेवा आणि गोरक्षण बाबत उपस्थितांना माहिती देऊन घरातील गायी पैश्यासाठी कसायांना न विकण्याचे आवाहन केले. त्यानंतर नांदगाव पेठ येथील सुपुत्री भक्ती अरविंद देशमुख यांनी अयोध्या येथील राममंदिर ही तमाम हिंदूंसाठी गौरवाची बाब असून यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्या कारसेवकांबद्दल आज आदर निर्माण होत असल्याचे म्हटले. आमची आठवी पिढी नांदगाव पेठ येथील राममंदिराची सेवा करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
या धर्मसभेला शेकडो हिंदू बांधव व भगिनींनी उपस्थिती होती. जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या धर्मसभेच्या यशस्वीतेसाठी बजरंग दल,विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

■कलशयात्रा ठरली आकर्षण■

अयोध्या येथील आलेल्या अक्षद कलशची धर्मसभेपुर्वी कलशयात्रा गावामधून काढण्यात आली.श्रीराम यांची भव्य प्रतिमा सुद्धा या यात्रेमध्ये होती. टाळ मृदुंगाच्या गजरात व जय श्रीरामच्या घोषणांनी निघालेली ही कलशयात्रा प्रमुख आकर्षण ठरली होती.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!