कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र तातडीने निर्गमित करा
■शिवसेनेचे छत्रपती पटके यांची मागणी
■कोळी महादेव बांधवांचे २१ दिवसांपासून उपोषण करण्यासाठी
■मिररवृत्त
■अमरावती
कोळी महादेव बांधवांच्या मागण्यांसाठी तसेच कोळी महादेव प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी समाज बांधवांचे गेल्या २१ दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू असून शासनाने उपोषणाची दखल न घेतल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख छत्रपती पटके यांच्या नेतृत्वात मंगळवारी विभागीय आयुक्त यांना निवेदन देऊन प्रमाणपत्र देण्याबाबत आदेश द्यावे अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात नियमावली बनवून कोळी महादेव जमातीला प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे स्पष्ट आदेश दिले असतांना सुद्धा शासन याबाबत गंभीर नसून मागील २१ दिवसांपासून राजू जुवार,गजानन चुनकीकर,मीरा कोलटेके, दिलीप जामनेकर यांचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. याबाबत शासन गंभीर नसल्याने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख छत्रपती पटके यांनी कोळी महादेव जमातीच्या बांधवांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला तसेच विभागीय आयुक्त यांना भेटून कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यासंदर्भात आपण संबंधित विभागाला आदेश द्यावे अशी मागणी छत्रपती पटके यांनी केली.यावेळी शिवसेना पदाधिकारी यांचेसह कोळी महादेव बांधव उपस्थित होते.