spot_img

रस्ते वाहतूक मंत्री ना.नितिन गडकरी उद्या अमरावती जिल्हा दौऱ्यावर

रस्ते वाहतूक मंत्री ना.नितिन गडकरी उद्या अमरावती जिल्हा दौऱ्यावर

■मिररवृत्त
■अमरावती

रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उद्या अमरावती दौऱ्यावर आहेत.डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त श्री.शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असणार आहे.
बुधवार, दि. 27 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता बेलोरा विमानतळ येथे आगमन व अमरावती विभागातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पाहणी. दुपारी 2.30 वाजता श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पंचवटी चौक, अमरावतीकडे प्रयाण व आगमन. दुपारी 3 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख यांची 125 व्या जयंती निमित्त शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथील कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळ 4.30 वाजता श्रीकृष्ण पेठकडे प्रयाण. सायंकाळ 4.35 वाजता महिन्द्रा राहटगांवकर यांचा निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 4.50 वाजता अमरावती बेलोरा विमानतळकडे प्रयाण. सायंकाळ 5.15 वाजता अमरावती बेलोरा विमानतळ, अमरावती येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!