spot_img

उद्यापासुन अमरावती जिल्ह्यात भव्य महिला पुरूष बाल गट भजन स्पर्धा ,१० लक्ष रुपयांचे आकर्षक बक्षिसे,ॲड.यशोमती ठाकूर यांचे आयोजन

उद्यापासुन अमरावती जिल्ह्यात भव्य महिला पुरूष बाल गट भजन स्पर्धा

■१० लक्ष रुपयांचे आकर्षक बक्षिसे
■ॲड.यशोमती ठाकूर यांचे आयोजन

■मिररवृत्त
■अमरावती

रामचंद्र युवक कल्याण संस्था मोझरी , अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारा स्व.भैय्यासाहेब ठाकुर यांच्या जयंती निमित्त अमरावती लोकसभा मतदार क्षेत्रातील जनतेकरीता भव्य महिला पुरूष व बालगट भजन स्पर्धा आयोजीत करण्यात महाराष्ट्रातील संताचा खरा विचार जनमानसात पोहचावा व समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने या भजन स्पर्धा आयोजन विविध तालुक्यात केलेले आहे.
उद्या भवानी शिव मंदिर चिखलदरा येथुन दिनांक २७ डिसेंबर पासुन स्पर्धेला सुरवात होणार आहे तर पुढे अमरावती ग्रामीण तालुका २ जानेवारी राष्ट्रसंत जन्मस्थान स्मूती मंदिर यावली चांदुर बाजार दिनांक ५ जानेवारी संगेकर मंगल कार्यालय अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मोर्शी ग्रामीण १०जानेवारी ज्वालागीरी महाराज संस्थान नेरपिंगळाई अमरावती बडनेरा शहर ११ जानेवारी काँग्रेस भवन मालटेकडी रोड अमरावती भातकुली दिनांक १२जानेवारी श्री राम मठ मैदान टाकरखेडा संभू तिवसा १६ जानेवारी श्रीजित मंगल कार्यालय अंजनगाव सुर्जी १९ जानेवारी वेद मंदिर गुलजार पुरा नगर परिषद जवळ दर्यापूर २३ जानेवारी महेश्वरी मंगल कार्यालय आकोट रोड धारणी २४ जानेवारी बालाजी मंगल कार्यालय धारणी तर अंतिम फेरी स्व भैय्यासाहेब ठाकुर समाधी स्थळ मोझरी येथे दिनांक २७ जानेवारी ला पुरूष व बाल गट व दिनांक २८ जानेवारी ला महिला गटाची अंतिम फेरी व बक्षिस वितरण सोहळा होईल.
स्पर्धेला आमदार यशोमती ठाकुर जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंडळी अमरावती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे,माजी आमदार विरेंद्र जगताप, अमरावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोलेहे प्रमुख उपस्थितीत राहणार आहे.यावेळी काँग्रेसच्या सर्व सेलचे तालुका जिल्हा , तालुका अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते गुरुदेव सेवा मंडळ वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी पत्रकार यांचा सत्करा सोहळा सुद्धा आयोजित केला आहे स्पर्धेतला मार्गदर्शक म्हणुन महाराष्ट्रातील उत्कृष्ट गायक गोपालजी सालोडकर व पराग पदवाड तर स्पर्धा व्यवस्थापन नगरसेवक अमर वानखडे डॉ रघुनाथ वाडेकर करणार आहे तरी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक मंडळास प्रोत्साहनपर ७०० रुपये रोख बक्षिस सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देण्यात येईल जिल्ह्यातील जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आमदार यशोमती ठाकुर यांनी यांनी केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!