spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बैठा सत्याग्रह ,खासदारांच्या निलंबनामुळे निषेध आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बैठा सत्याग्रह

■खासदारांच्या निलंबनामुळे निषेध आंदोलन

■मिररवृत्त

■अमरावती

एका मागोमाग संसदेच्या दोन्हीही सभागृहातील 146 खासदार निलंबन करून विरोधी पक्षमुक्त संसद या सत्ताधारी पक्षाच्या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी दि. 26 डिसेंबर 2023 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथे राष्ट्रवादी पक्ष शहर जिल्हा यांच्यातर्फे संवैधानिक शांततापूर्ण मार्गाने बैठा सत्याग्रह करण्यात आला.
संसदेच्या सुरक्षा महत्त्वाचा विषय असून ,संरक्षणाच्या तृटीवर देशाच्या गृहमंत्र्यांनी निवेदन करावे ही विरोधी पक्षाची मागणी होती त्यावर निवेदन देण्याऐवजी , कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा निर्यातबंदी सारख्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांनी प्रश्न उपस्थीत करताच, संसदेचा संरक्षणाचा विषय नसताना सुद्धा यांच्यावर कारवाई निलंबनाची कारवाई करण्यात आली.
संसदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये सामूहिक जबाबदारी म्हणजे लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे होय. हे लोकशाहीचे महत्त्वाचे मूल्य आहे. प्रश्न विचारणे हे बाद करणे म्हणजे लोकशाहीची गळचेपी असून संसदीय परंपरांचा अपमान आहे . एवढेच नसून त्यानंतरच देशातील तिन फौजदारी कायदे, निवडणूक आयुक्ताच्या निवड समितीतून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना हटवणे , देशद्रोहाच्या कायद्यातील सुधारणा असे कायदे विरोधी पक्षांच्या खासदारांना निलंबित असताना त्यांच्या अनुपस्थितीत मनमानी पद्धतीने संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले.
संसदेच्या पटलावर एकतर्फी प्रक्रिया पार पाडण्याचे लोकशाहीला मारक उद्योग राजरोसपणे सुरू आहे. या लोकशाही विरोधी घटनांचा निषेध व्यक्त करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. INDIA आघाडीच्या शिर्शस्थ नेतृत्वाने सामूहिक जवाबदारीचे प्रदर्शन करून दिल्लीत सलग तीन दिवस आंदोलन केले आणि सत्तारूढ पक्षाचे असवैधनिक , लोकशाही विरोधी धोरणांचा तीव्र विरोध केला. याच मालिकेचा भाग म्हणुन INDIA आघाडीच्या अमरावती जिल्ह्यातील सर्व मान्यवर राजकिय नेत्यांच्या मार्गदर्शनात ” बैठा सत्याग्रह ” आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा संघटनेच्या पुढाकाराने आज दि. २६.१२.२०२३ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळ इर्विन चौक, अमरावती येथे संपन्न झाला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गणेश राय प्रदेश उपाध्यक्ष, प्रा. हेमंत देशमुख, प्रदीप राऊत, प्रवीण काशीकर ,वर्षाताई गतफणे, वाहिद खान,सय्यद मन्सूर भाई, मंगेश भटकर , अमित गावंडे, प्रा. अनिल राऊत, ऍड.अक्षय ढोले,ऍड.धनंजय तोटे,संजीवनी काळे,सतीश देशमुख,रोशन कडू , दिलीप वराडे, सुनील वासनकर, शकूर बेग, आरिफ शेख, आसिफ खान, ऍड. रवी खडसे, संघरत्न नन्नवरे ,गौरव वाटाणे सतीश चरपे , निखिल पानसे, नितीन राऊत,मोबिन मझिद, दिलीप सावदे, विशाल बोरखडे ,नितीन तायडे, गौरव जवंजाळ ,सचिन गुलाम, रजत पितळी, धम्मा मोहळ ,विक्रम ढोके , वसंत पाटील , विणेश आडतिया,प्रवीणअडाळसे,विशाल बोरखडे, नितीन तायडे,दिलीप सावदे, सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!