बाळासाहेब राऊत शिवसेनेच्या तालुका संघटकपदी
■अरुण पडोळे यांनी दिली जबाबदारी
■मिररवृत्त
■नांदगाव पेठ
येथील ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब उर्फ श्रीधर राऊत यांची शिवसेनेच्या अमरावती तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.अमरावती येथील विश्रामगृह याठिकाणी पार पडलेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष अरुण पडोळे यांनी राऊत यांच्याकडे संघटक पदाची जबाबदारी दिली असून भावी वाटचालीस सुद्धा शुभेच्छा प्रदान केल्या.
रविवारी झालेल्या बैठकीला अरुण पडोळे यांच्यासह दिपक मदने, संतोष बद्रे, नमिता तिवारी, छत्रपती पटके, संजय टेकाडे, मंगेश काळमेघ, ज्योती पन्नासे, गोलु यादव, दिपक खैरकर, नितेश शर्मा, गुड्ड कत्तलवार, रितेश देशमुख यांचेसह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बैठकीत बाळासाहेब राऊत यांची तालुका संघटक पदी तर मिलन कोठे यांची उपतालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
अरुण पडोळे यांनी दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बाळासाहेब राऊत यांची नियुक्ती झाल्यामुळे नांदगाव पेठ मधील मान्यवर, नागरिकांनी तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.