spot_img

आमदार वानखडे यांच्या कार चालकाला अटकः भावाच्या अपघाती मृत्यूनंतर दुसऱ्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू

आमदार वानखडे यांच्या कार चालकाला अटकः

■भावाच्या अपघाती मृत्यूनंतर दुसऱ्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू

■मिररवृत्त
■अमरावती

काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांच्या भरधाव कारने शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी दर्यापूर-अमरावती मार्गावर लखापूर फाट्याजवळ उभ्या ट्रॅक्टर-ट्रालीला धडक दिली. त्यात मोहम्मद खालिद मो. अजमद (६३) यांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान अपघातात मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याची लहान भाऊ जाहेद मो. अमजद (५९) यांना मिळाली. भावाच्या अपघाती मृत्यूचे वृत्त कळताच दोन तासांच्या फरकाने हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने जावेद यांचाही मृत्यू झाला. शनिवारी (दि. २३) दुपारी दोन्ही भावांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान कार चालकाला पोलिसांनी शनिवारी अटक केली.

दर्यापूर तालुक्यातील लखापूर फाट्याजवळ शेतात कापूस वेचणी झाल्यानंतर मुख्य रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-ट्रालीत मजूर कापसाचे गाठोडे ठेवत होते. त्याच वेळी भरधाव आलेल्या आ. बळवंत वानखडे यांच्या भरधाव कारने (एमएच २७ / सीक्यू २१२९) ट्रॅक्टर-ट्रालीला जोरदार धडक दिली. या अपघातात शेतमालक तथा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मो. खालिद यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर सहा मजूर जखमी झालेत. अपघाताच्या वेळी आ. वानखडे माजी मंत्री आ. यशोमती ठाकूर यांच्या वाहनात होते. तर आ. वानखडेंच्या कारमध्ये चालक व त्यांचे स्वीय सहायक होते. घटनेनंतर दर्यापूर पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर पंचनामा करून अपघाताला कारणीभूत ठरलेली आमदारांची कार रात्रीच ताब्यात घेतली होती.

‘कार घेतली ताब्यात; गुन्हा नोंदवून चालकास अटक कार चालक अंकुश नागोराव डोंगरदिवे (२६) रा. लेहगाव (रेल्वे), ता. दर्यापूर याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला शनिवारी अटक केली. घटनेचा पुढील तपास दर्यापूर पोलिस करत असल्याची माहिती ठाणेदार संतोष ताले यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेला कारणीभूत असलेली कार ताब्यात घेण्यात आली’

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!