spot_img

खा.शरद पवार २७ व २८ डिसेंबरला अमरावती जिल्हा दौऱ्यावर

खा.शरद पवार २७ व २८ डिसेंबरला अमरावती जिल्हा दौऱ्यावर

■मिररवृत्त
■अमरावती

राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार दि.२७ व २८ डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहे.
२७ तारखेला सकाळी ११ वाजता शरद पवार यांचे अमरावती शहरात आगमण होणार असून दुपारी १२ ते २ या वेळेत ते श्री शिवाजी शिक्षण संस्थेव्दारा आयोजित डॅा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. दुपारी ३ ते रात्री उशीरापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामग्रुहामध्ये ते जिल्हाभरातील राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षासहीत ईतरही सहकारी पक्षाच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेवुन चर्चा करतील.
पक्षाची संघटन बांधणी व आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे कार्यकर्त्यांची मते जाणून घेतील.
यानंतर २८ डिसेंबरला सकाळी ते अचलपूर -परतवाडा भागात दौऱ्यावर जाणार असून अचलपुर -चिखलदरा सिमेलगतच्या ऊपटखेडा येथे आयोजित वनहक्क परीषदेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील त्यानंतर दुपारनंतर ते मुंबई कडे रवाना होतील.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!