spot_img

स्व.प्रा.डॉ.एम.आर.देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ वडूरा व सारसी येथील विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण

स्व.प्रा.डॉ.एम.आर.देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ वडूरा व सारसी येथील विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण

■मिररवृत्त
■अमरावती

समाजशास्त्रज्ञ प्रा.डॉ. एम.आर.देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित सुखदेवराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडुरा व माध्यमिक विद्यालय सारसी कोठोडा ता.नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे इयता 5 ते 12 च्या विद्यार्थ्याना संस्थेचे कोषाध्यक्ष मा.प्रा.डॉ.हेमंत देशमुख यांच्या हस्ते नोटबुक चे वितरण करण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ. हेमंत देशमुख यांनी विद्यार्थ्याना संबोधित करतांना शालेय जीवनात अभ्यासाचे तंत्र तसेच महत्व आपल्या मार्गदर्शनातून विषद केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.सी. सलामे ,सहाय्यक शिक्षक डी. एस.समर्थ, कनिष्ठ महाविद्यालयाचे डॉ.एस. सी. देशमुख, व्हि.ए.चव्हाण,ए.एस.ठाकरे तसेच सहायक शिक्षिका पी.जी.देशमुख,के.एस. बांबोळे,जे.ए.सुलताने,पेंढारकर ,चतुर्थ श्रेणी कर्मचारी सवळकर तसेच सारसी कोठोडा येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.आर.उगले,सहाय्यक शिक्षक एम.आर.सिसोदे,सहायक शिक्षिका एस.टी.डोंगरे,व्हि.ए.मालवे तसेच शिक्षकेतर कर्मचारी एस.ए. तांदळे,आर.व्ही.मसराम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!