spot_img

बारलिंगा गावातील आदिवासी बांधवांना कपडे वाटप ,रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाचा पुढाकार

बारलिंगा गावातील आदिवासी बांधवांना कपडे वाटप

■रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाचा पुढाकार

■मिररवृत्त
■अमरावती

सातत्याने सामाजिक कार्यात पुढे असणाऱ्या व माणुसकीची भिंत उभारणाऱ्या रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाच्या पुढाकाराने चिखलदरा तालुक्यातील बारलिंगा या गावातील आदिवासी बांधवांना , जॉय ऑफ गिव्हीग कार्यक्रमा अंतर्गत कपडे वाटप करण्यात आले.सामाजिक दायित्व निभावणाऱ्या रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाच्या या उपक्रमाने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले होते.
रोटरी क्लब दरवर्षी हा उपक्रम राबवत असतो.वेगवेगळ्या ठिकाणी आदिवासी बांधव तसेच लहान मुलांसाठी उत्तम दर्जाचे कपडे रोटरीच्या माध्यमातून देण्यात येते. रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून सर्व आदिवासी बांधवांना कपडे वाटप करून यानिमित्ताने त्यांच्याशी हितगुज सुद्धा करण्यात येते.
यावेळी बार लिंगा गावाचे सरपंच निर्मला दिलीप धांडे, वस्तापूर येथील सरपंच केवल झामरकर,वनवासी कल्याण आश्रम मलकापूर येथील सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी या उपक्रमामध्ये रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिका चे अतुल कोल्हे, प्रवीण बोडखे, कीर्ती बोडखे, डॉ. समीर केडीया, डॉ. स्वाती केडीया, , गौरव वानखडे, अमित हिंडोचा, गीता हिंडोचा, अनुश्री टिंगणे यांनी परिश्रम घेतले

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!