spot_img

भारत संकल्प यात्रा की भाजपची जत्रा ? शासकीय कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांची मनमानी

भारत संकल्प यात्रा की भाजपची जत्रा ?

■शासकीय कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांची मनमानी
■काँग्रेस ने दिली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

■मिररवृत्त
■अमरावती

केंद्र सरकारच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा रथ गावागावात फिरतो आहे मात्र प्रत्येक ठिकाणी भाजप कार्यकर्ते या कार्यक्रमात हस्तक्षेप करत शासकीय कार्यक्रमाला भाजपचा कार्यक्रम असल्यागत उपस्थित नागरिकांच्या गळ्यात बळजबरीने पक्षाचे दुपट्टे टाकून व हातात झेंडे देऊन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार काँग्रेस पक्षाचे अमरावती तालुकाध्यक्ष ऍड. अमित गावंडे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
केंद्र सरकारच्या प्रमुख योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा राज्यातील प्रत्येक गावात पोहचत असून वाहनावर असलेल्या दुरदृष्यप्रणालीद्वारे नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देत आहे. अमरावती जिल्ह्यात सुद्धा हे वाहन फिरत असून प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात येत आहे. परंतु बहुतांश गावात विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली की त्या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी डावलून भाजपचे कार्यकर्ते आपलीच यात्रा भरवत आहे. उपस्थित नागरिकांच्या गळ्यात भाजपचे दुपट्टे टाकून पक्षाचे झेंडे मिरवत या शासकीय कामात अडथळा निर्माण करत आहेत, शिवाय सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांना धमकावत हिंसक वातावरण निर्माण करत आहेत त्यामुळे भाजपच्या अश्या बिन बुलाये मेहमान कार्यकर्त्यांवर प्रशासनाने अंकुश लावावा अन्यथा याविरोधात आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना काँग्रेस चे अमरावती तालुकाध्यक्ष ऍड.अमित गावंडे,कृ.उ.बा.स चे सभापती हरीश मोरे, दिलीप सोनोने, गजानन देशमुख, प्रा.चेतन जवंजाळ,शंतनू निचित, सुकुमार खंडारे, रणजित तिडके, अतुल यावलीकर, दिनेश मोरे यांचेसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!