spot_img

विमानतळांवर आता कोरोना चाचणी करणे अनिवार्य नाही: महाराष्ट्रात 63 हजार विलगीकरण बेड्स उपलब्ध

विमानतळांवर आता कोरोना चाचणी करणे अनिवार्य नाही: महाराष्ट्रात 63 हजार विलगीकरण बेड्स उपलब्ध

■मिररवृत्त
■मुंबई

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ५९४ नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २६६९ वर पोहोचली आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळांवर कोरोनाची अनिवार्य आरटीपीसीआर चाचणी पुन्हा लागू करण्याचा कोणताही विचार नाही.जुलैमध्ये केंद्र सरकारने विमानतळांवर दोन टक्के प्रवाशांच्या रँडम आरटीपीसीआर चाचणीची मार्गदर्शक तत्त्वे रद्द केली होती. आतापर्यंत जेएन-१ चे २१ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांपैकी ९२ टक्के रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात ६३ हजार विलगीकरण बेड्स, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स, ९ हजार ५०० आयसीयू बेड्स व ६ हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे ४५ रुग्ण आढळून आले,असे आरोग्य विभागाने सांगितले. गेल्या दोन आठवड्यांत कोरोनामुळे २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत केरळ ३, कर्नाटक २ आणि पंजाबमध्ये १ रुग्ण दगावला आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!