spot_img

तब्बल 61 लाखांचे मटन,चाप,खिमा :मटणाची उधारी न दिल्याने पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल मालकावर फसवणुकीचा गुन्हा

तब्बल 61 लाखांचे मटन,चाप,खिमा

■मटणाची उधारी न दिल्याने पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल मालकावर फसवणुकीचा गुन्हा

■मिररवृत्त
■पुणे

एका हॉटेलसाठी क्रेडीटवर मटन विक्रेत्या व्यापाऱ्याकडून तब्बल 2 कोटी 91 लाखांचे मटन खरेदी करून त्यातील 2 कोटी 30 लाख 19 हजार 675 रूपये देऊन उर्वरीत रक्कम 61 लाख 62 हजार 140 रूपयांची फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात कोंढव्यातील प्रसिद्ध बागवान हॉटेलच्या मालकांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बागवान हॉटेलचे मालक अफजल युसूफ बागवान (65, रा.कौसरबाग) आणि अहतेशाम अयाज बागवान (35) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत मटन विक्रेता शादाफनिजाम पटेल (43, रा. जान मोहम्मद स्ट्रीट, कॅम्प, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार 2019 ते 2023 दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागवान हॉटेलचे मालक बागवान यांनी तक्रारदार पटेल यांच्याकडून एकूण 2 कोटी 91 लाख रूपयांचे मटन, चाप, खिमा, गुरदा ईत्यादी मटन घेतले. त्यापैकी बागवान यांनी केवळ 2 कोटी 30 लाख 19 हजार रूपये परत केले नाही. त्यांनी उर्वरीत 61 लाख 62 हजार न देता बागवान यांनी त्या रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास लष्कर पोलिस करत आहे.

■नागपूर कारागृहात स्थानबध्द■

वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदेशीर हतर बाळगणे असे पाच वर्षामध्ये चार गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुंडावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबध्दतेची कारवाई केली. ऋषीकेश शंकर केदारी (21, रा. बालाजी मेडीकल समोर, वारजे माळवाडी) असे स्थानबध्द करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे.पोलिस आयुक्तांनी केलेली ही एमपीडीएची 73 कारवाई आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!