spot_img

गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त राधानगरात महाप्रसाद , दिंडीचे स्वागत, दहीहंडी,काला- साईराम मंडळाचे आयोजन

गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त राधानगरात महाप्रसाद

■ दिंडीचे स्वागत, दहीहंडी,काला- साईराम मंडळाचे आयोजन

■मिररवृत्त
■अमरावती

राधानगर येथील साईराम मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त गुरुवार दिनांक 21 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.हजारो भाविक
भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त निघालेल्या दिंडीचे स्वागत साईराम मंडळामार्फत करण्यात आले.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नितीन तालन यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले व दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रमास प्रारंभ झाला.
परिसरातील हजारो भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुशील चौधरी,योगेंद्र तालन, मनोहर घुले,माणिकराव घुले, राजाभाऊ तालन,अरुण नांदगावकर, अशोक मिसाळ,मोहनीश मिसाळ,निखिल मिसाळ,हर्षद चौधरी,जयप्रकाश घुले,राजाभाऊ घुले, विकी घुले,दिनेश घुले, पवन तालन,विजय देशमुख, राजू विधले, संदीप ठाकरे, नाना उमेकर शेखर काळे, राजाभाऊ काळे, प्रशांत खरे, मनोरे काका,संजय साखरे,मोनू गायकवाड,शशी नाथे बंटी काळे, महेश माधुगडिया,सुनील खताडे, हेमंत ठाकरे,प्रमोद महल्ले,राहुल हाडोळे, संजय बनारसे, राजूभाऊ खवले, रमेश बिजवे तुळशीरामजी चौधरी, विजय किल्लेकर,प्रवीण चौधरी, राहुल मानकर,राजेश भालेराव,महेंद्र किल्लेकर,लक्ष्मण वाडकर,गाढवे काका,मनोज बेले, तन्मय मोहोड ,दुर्गेश किल्लेकर,राजेश विघे आदींनी परिश्रम घेतले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!