25 ला नांदगाव पेठ मध्ये विशाल धर्मसभा
गीता जयंती व शौर्यदिवसानिमित्य आयोजन
काजल हिंदुस्थानी व नेहा पटेल यांची उपस्थिती
नांदगाव पेठ/प्रतिनिधी
गीता जयंती आणि शौर्य दिवसाचे औचित्य साधून बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने २५ डिसेंबर रोजी नांदगाव पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विशाल धर्मसभेचे आयोजन करण्यात येत आहे. गुजरात येथील प्रखर राष्ट्रभक्त काजल हिंदुस्थानी,गोरक्षक नेहा पटेल व भक्ती देशमुख यांची या धर्मसभेला उपस्थिती असणार आहे.
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दरवर्षी धर्म सभेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने श्रीराम जन्मभूमीअयोध्या येथून आलेल्या अक्षद कलश ची पूजा करण्यात येणार असून परिसरात अक्षद वाटप करण्यात येणार आहे.काजल हिंदुस्थानी यु ट्यूबच्या माध्यमातून प्रखर हिंदुत्ववादी विचारधारेचा प्रचार प्रसार करतात. त्यांचे लाखो फलोअर्स असून त्यांच्या व्हिडिओ ला अधिक पसंती आहे.अलीकडेच त्यांच्या वाराणसी येथील संस्कृती संसद मधील १४ मिनिटांच्या भाषणाची चित्रफीत खूप व्हायरल झाली. भक्ती अरविंद देशमुख यांचे विचार सुद्धा प्रखर हिंदुत्ववादी असून राज्यभरात विविध ठिकाणी त्यांचे सुद्धा मोठमोठे धार्मिक कार्यक्रम होत असतात.
या वर्षी होणाऱ्या गीता जयंतीनिमित्य नारीशक्तीचा हा अद्भुत हिंदुत्ववादी जागर उत्साह निर्माण करणारा असून या कार्यक्रमाला उपस्थिती राहण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल ने केले आहे.