spot_img

राज्यातील अनेक जिल्ह्यांत थंडीची लाट:आणखी काही दिवस थंडी कायम,नाताळनंतर थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता

राज्यातील अनेक जिल्ह्यांत थंडीची लाट:आणखी काही दिवस थंडी कायम,नाताळनंतर थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता

■मिररवृत्त
■अमरावती

राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. हवामानातील बदलांमुळे सध्या महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. महाराष्ट्रात आठवडाभर कोरडे वातावरण राहणार आहे तर आणखी आठवडाभर थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नाताळच्या वेळी तापमानात किंचित वाढ होणार आहे. मात्र त्यांनतर पुन्हा तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.
सोमवारपासूनच राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारठा कायम आहे. पहाटे आणि रात्री थंडी जाणवत आहे. याशिवाय याठिकाणी तापमानाचा पारा देखील घसरला आहे.तर आज (ता. 21) विदर्भासह राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

■विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हुडहुडी■

राज्यात हळूहळू तापमानाचा पारा घसरत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील किमान तापमान 12 अंशाखाली गेले आहे.त्यामुळे थंडी वाढली आहे. विदर्भातील अमरावती,यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिममधील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.

■मुंबईत 25 डिसेंबरनंतर तापमानात घट■

मुंबईत मात्र थंडी काहीशी कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात शहराचे तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेले होते. मात्र सोमवारपासून मुंबईच्या किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागनुसार, 25 डिसेंबरनंतर मुंबई आणि उपनगरात पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

■नाताळनंतर राज्यातील तापमानात घट■

अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. याचा परिणाम देशासह राज्याच्या हवामानावर होताना दिसत आहे. आता काही दिवस तापमानात वाढ होताना दिसेल. मात्र, 25 डिसेंबरनंतर वेस्टर्न डिस्टबर्न्स तसेच उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात पुन्हा एकदा घट होण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत थंडीची लाट बुधवारी (ता. 20) यवतमाळ येथे 8.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले असून, सरासरीपेक्षा 5.4 अंशांची घट झाली आहे. यवतमाळसह धुळे येथेही पारा 7.5 अंशांपर्यंत घसरल्याने थंडीच्या लाटेची परिस्थिती आहे. कोकणासह दक्षिणेकडील जिल्ह्यात किमान तापमान अद्यापही 15 अंशांच्या वरच आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!