spot_img

विदर्भातील पारधी समुदायाने घेतली आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांची भेट

विदर्भातील पारधी समुदायाने घेतली आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांची भेट

■मिररवृत्त
■अमरावती :

पारधी समुदायाच्या मागण्यांसंदर्भात नुकतीच विदर्भातील पारधी समुदायाच्या एका शिष्टमंडळाने आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांच्याशी भेट घेऊन चर्चा करण्यात आली.पारधी पॅकेज, घरकुल योजना,रोजगार व वन हक्क याबाबत चर्चा करून पारधी समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच शासनाच्या विविध समित्यांवर पारधी बांधवांची नियुक्ती करावी अशी शिष्टमंडळाच्या वतीने विनंती करण्यात आली.
सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी या बैठकीचे नियोजन केले होते.विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात असलेला पारधी बांधव हा मुख्य प्रवाहापासून दूर आहेच शिवाय शासनाच्या कोणत्याही योजना समाजाला मिळत नसल्याने पारधी बांधवांवर उपासमारीचे देखील संकट कोसळले असल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली. मंत्री विजयकुमार गावित यांनी शिष्टमंडळाची बाजू समजून घेऊन नक्कीच उपाययोजना करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले.
यावेळी शिष्टमंडळाचे निकिता पवार,अभय पवार ,विनोद पवार
सोमनाथ पवार,इशू माळवे यांचेसह विदर्भातील प्रतिनिधी मंडळ उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!