spot_img

स्व.दत्तात्रय पुसदकर महाविद्यालयाचे गाडगे बाबा पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता मोहीम

स्व.दत्तात्रय पुसदकर महाविद्यालयाचे गाडगे बाबा पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता मोहीम

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

नांदगाव पेठ येथील स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दरणे यांच्या हस्ते गाडगे बाबांच्या प्रतिमेला हरार्पण करून गाडगेबाबांना वंदन करण्यात आले.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक यांनी ‘स्वच्छ भारत स्वस्थ भारत’ या अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. गोविंद तिरमनवार, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. सुनिता बाळापुरे, सहकार्यक्रमाधिकारी डॉ.सुभाष पवार, डॉ. पी. आर. जाधव, दिलीप पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ केला. त्यानंतर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व परिसर स्वच्छ केला. या ठिकाणी नांदगाव पेठ येथील समाजसेवक श्री. बंडू सुंदरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश याचे कायम स्मरण करीत विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात स्वच्छतेला विशेष महत्त्व द्यावे असा महत्वपूर्ण संदेश श्री. बंडू सुंदरकर यांनी याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना दिला.
या स्वच्छता मोहिमेत महाविद्यालयातील प्रा. राजेश ब्राह्मणे,डॉ.श्रीकांत माहुलकर, डॉ. विकास अडलोक, डॉ. पंकज मोरे, श्री ज्ञानेश्वर बारस्कर, रेखा पुसतकर, दिलीप पारवे,विनायक पावडे, अनिल शेवतकर, राहुल पांडे यांच्यासह रासेयो स्वयंसेवक कु.सपना धर्माळे, दुर्गेश्वरी वंजारी प्रज्वल फुके, ओम शेंदरकर, श्रीकांत गाडे, ईश्वरी अटाळकर, धनश्री दुर्गे, सुष्मिता पुरी, साक्षी डुकरे, योगेश शेंदरकर, गायत्री सावरकर, निहारिका डोईफोडे, वैष्णवी गायकवाड, समीक्षा मोरे उत्साहाने सहभागी झाले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!