spot_img

श्री संताजी समाज विकास संस्थेतर्फे संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

श्री संताजी समाज विकास संस्थेतर्फे संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

■मिररवृत्त
■अमरावती

तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्री संताजी समाज विकास संस्थेतर्फे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम देखील पार पडले.
श्री संताजी समाज विकास संस्थेच्या कलोती नगर स्थित कार्यालयात आयोजित जयंती सोहळ्यात सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय आसोले यांच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. त्यानंतर हभप चव्हाण व त्यांच्या चमुने भजनाचा कार्यक्रम सादर केला. महाआरती व प्रसाद वाटपाने जयंती सोहळ्याची सांगता करण्यात आली .यावेळी संगीताताई शिंदे, बंडू हिवसे, प्रवीण गुल्हाने यांची विशेष उपस्थिती दर्शवित तेली समाज बांधवाना शुभेश्च्या दिल्या . या कार्यक्रमास दिलीप बिजवे , रमेश शिरभाते ,गंगाधरराव आसोले,चंदू पिंपळे , मधुकरराव कावडकर, प्रा. डॉ अनुप शिरभाते ,मिलिंद शिरभाते ,आशिष आगरकर, प्रा. सुनील जयसिंगपुरे, ऍड चारुदत्त गुल्हाने ,अतुल बिजवे, डॉक्टर राजू बनारसे , सुदर्शन सव्वालाखे , प्रा. अनिल असोले ,विलास शिरभाते , किशोर शिरभाते ,मधुकरराव शिंदे , सुनील पचगडे, अविनाश गुल्हाने, विजय राजगुरे, मनीष सवालाखे, प्रा. डॉ. मंगेश गुल्हाने, प्रा. डॉक्टर राजीव गुल्हाने, बिजवे साहेब , मोगरकर साहेब, नंदू रावेकर , नंदकुमार शिरभाते, सचिन फणसे, तसेच सौ मनीषा गुल्हाने, सुशीला शिरभाते ,सौ शिंदे ,सौ गुल्हाने,सौ रावेकर ,सौ चौधरी ,सौ सरिता आसोले ,सौ योगिता शिरभाते ,सौ उज्वला शिरभाते, सौ रेणुका राजगुरे ,सौ स्वाती जयसिंगपूरे तसेच तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!