spot_img

डॉ राजेश जवादे राज्य भूषण पुरस्काराने सन्मानित

डॉ राजेश जवादे राज्य भूषण पुरस्काराने सन्मानित

■मिररवृत्त
■अमरावती

अमरावती शहरातील महालक्ष्मी नेत्रालय आणि महालक्ष्मी रुग्णालयाचे संचालक व प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर राजेशकुमार एस जवादे यांना नागपूर येथील फ्युचर अर्थ फाउंडेशन तर्फे राज्य भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डॉक्टर राजेशकुमार जवादे यांना राज्य पुरस्कार राज्यभूषण पुरस्कार बहाल करण्यात आला. यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे ,ज्येष्ठ संपादक नानक आहुजा ,सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन गांग ,फ्युचर अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष भोरे आदी मान्यवर उपस्थित होते. नेत्र चिकित्सा आणि सामाजिक क्षेत्रात डॉ. जवादे यांचे मोठे योगदान असून त्यांच्या या योगदानाची दखल घेत फ्युचर अर्थ फाउंडेशन तर्फे प्रतिष्ठेचा राज्यभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. राजेशकुमार जवादे यांचा विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था संघटनांसोबत संबंध असून ते विविध पदांवर कार्य करीत आहे. नेत्र चिकित्सा तसेच विविध क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना राज्य सरकार आणि सामाजिक संघटनांतर्फे विविध पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले असून फ्युचर अर्थ फाउंडेशनने राज्यस्तरीय राज्यभूषण पुरस्कार बहाल करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे .सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. जवादे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!