एकायन इंग्लिश स्कूल असद्पुर येथे संविधान दिन साजरा
•मिरर वृत्त
•असद्पुर प्रतिनिधी
गोविंद चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित एकायन स्कूल, असद्पुर येथे 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. यावर्षी संविधान दिनाचा कार्यक्रम स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांसोबत एकत्रितपणे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रातीमेचे पूजन करून करण्यात आली स्कूल मधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व आणि त्याचे मुलभूत अधिकार याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे आदर्श आणि त्याचे पालन करण्याचे महत्त्व सांगितले. शिक्षक व विद्यार्थी एकत्रितपणे संविधाना उद्द्देशिकेचे वाचन करण्यात आले . या प्रसंगी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले की, भारतीय संविधान देशाच्या सर्व नागरिकांना समान हक्क आणि कायदेशीर संरक्षण प्रदान करते.सार्वजनिक जीवनात आदर्श नागरिक म्हणून कसे वागावे याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले आणि संविधानाच्या तत्त्वज्ञानाचे पालन करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले .सदर कार्यक्रमा करीता कु. वैष्णवी ठाकरे , कु. शिवानी ठाकूर , कु. नियती तायडे, सौ. योगिताताई नितनवरे यांनी परिश्रम केलेत. सदर कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब अंबादास तायडे, सचिव डॉ.शीतल तायडे , कोषाध्यक्ष डॉ. स्मिता तायडे .सदस्य श्री. वैभव तायडे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले