spot_img

रामकृष्ण शिक्षण शास्त्र महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

रामकृष्ण शिक्षण शास्त्र महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

●मिररवृत्त
●अमरावती

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक द्वारा सलग्नित श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित, रामकृष्ण शिक्षण शास्त्र महाविद्यालय, उत्तम नगर अमरावती येथे बीएड प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस म्हणून मोठ्या उत्साह साजरा केला. यावेळी बीएड प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विषयी भाषण पर माहिती दिली.
वाचनाचे महत्त्व,याविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कृष्णा माकोडे, यांनी माहिती दिली. प्रा.डॉ. अनिल नागदेवते सर यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी मनोगत व्यक्त केले , प्रा. डॉ. रजनी भाकरे,मॅडम यांनी शिक्षणाचे महत्व, वाचाल तर वाचाल याविषयीं सांगितले ,प्रा. पुनम पाटील, प्रा. शिल्पा पाटील, ग्रंथपाल प्रा.गोंडाने सर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी श्री. संजय वानखडे, श्री अरबाज मोनावले, श्री.प्रेम वानखडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता बीएड प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!