spot_img

भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम महाविद्यालय रहाटगाव, अमरावती येथे भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी.

भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम महाविद्यालय रहाटगाव, अमरावती येथे भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी.
•मिरर वृत्त
•अमरावती प्रतिनिधी
आज 15 ऑक्टोबर रोजी डॉक्टर कलाम यांचा जन्म दिन सोबतच आजचा दिवस हा ‘जागतिक विद्यार्थी दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी डॉ. एपीजे अब्दुल कलाम कॉलेज येथे भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयातील दोन विद्यार्थी रजा शहा आणि पूजा ठाकरे यांनी अब्दुल कलामांचे चरित्र व त्यांच्या प्रेरणादायी जीवनाची माहिती दिली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुणा काकडे होत्या. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आपले जीवन सुकर करण्यासाठी अब्दुल कलाम यांचे विचार व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वाचन करून स्वतःला व देशाला कसे समृद्ध करता येईल याबद्दल मार्गदर्शन दिले.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षकवृंद प्रा. सोनल लोहाना, प्रा. सिमरन शेंडे , प्रा. मयुरी गोबाडे, प्रा. भाग्यश्री भोयर, प्रा. अर्जित तिवारी ,प्रा. अक्षय देठे , प्रा. अभिजीत खंडारे , शिक्षकेतर कर्मचारी ग्रं. राखी गचके , श्री हेमंत धर्माळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!