spot_img

तक्षशिला महाविद्यालय, दारापूर येथे डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी

तक्षशिला महाविद्यालय, दारापूर येथे डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी
•मिरर वृत्त
•अमरावती प्रतिनिधी:-
श्री. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती द्वारा संचालित, तक्षशिला महाविद्यालय दारापूर येथे ग्रंथालय विभागाच्या अंतर्गत दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मल्लू पडवाल सर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला रामकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. वर्षा मोर्शे मॅडम उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाला रामकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व तक्षशिला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्त्य तक्षशिला महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये “ग्रंथ प्रदर्शनी” आयोजित करण्यात आली. या ग्रंथ प्रदर्शनीमध्ये विश्वकोश, ज्ञानकोश, दुर्मिळ ग्रंथ तसेच वेगवेगळ्या कादंबऱ्या, नवीन स्पर्धात्मक पुस्तके, संदर्भ ग्रंथ या सर्वांचे प्रदर्शन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सर्व प्राध्यापकांनी या संधीचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे संचालन ग्रंथालय विभागप्रमुख डॉ. संदीप खंडारे यांनी केले तर प्रास्ताविक सहकार विभाग प्रमुख डॉ. यशवंत हरणे यांनी केले. डॉ. यशवंत हरणे यांनी आपल्या प्रास्ताविकामधून डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आणि त्यांनी ग्रंथालय शास्त्राची निर्मिती कशी केली या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन केले. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मल्लू पडवाल सर यांनी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांना डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. संदीप हाडोळे यांनी केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!