रश्मी ठाकरे,खा.सावंत व सुषमाताई अंधारे आज अमरावतीत
●मिररवृत्त
●अमरावती
शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ रश्मीताई उद्धव ठाकरे, शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क नेते खासदार अरविंद सावंत व शिवसेनेच्या मुलुख मैदानी तोफ सुषमाताई अंधारे शनिवार दिनांक १० रोजी अमरावती दौऱ्यावर येत आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी मासाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले असून या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून सौ रश्मीताई उद्धव ठाकरे, खासदार अरविंद सावंत व शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांना स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांनंतर सौ रश्मीताई उद्धव ठाकरे या अमरावती दौऱ्यावर येत असल्याने 0शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सौ ठाकरे या मुंबईवरून नागपूरपर्यंत विमानाने व तेथून कारने अमरावतीला येत असून कार्यक्रमापूर्वी त्या अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून महिला शिवसैनिकांची भेट घेणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी सांगितले.