spot_img

४ ऑक्टोबर रोजी श्रीरामचंद्र संस्थान येथील सभागृहाचे भूमिपूजन,खा.बळवंत वानखडे,आ.यशोमती ठाकूर,प्रीती बंड यांची उपस्थिती,४० लक्ष रुपयांचा निधी मंजूर

४ ऑक्टोबर रोजी श्रीरामचंद्र संस्थान येथील सभागृहाचे भूमिपूजन

खा.बळवंत वानखडे,आ.यशोमती ठाकूर,प्रीती बंड यांची उपस्थिती
४० लक्ष रुपयांचा निधी मंजूर

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

दोनशे वर्षांची परंपरा असलेले ब्राम्हणपुरा स्थित श्रीरामचंद्र संस्थान येथील सभागृहाचे दि.४ ऑक्टोबर रोजी भूमिपूजन होणार आहे. खा. बळवंत वानखडे व आ. यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पडणार असून या सभागृहासाठी खा.बळवंत वानखडे यांच्या निधीतून २० लक्ष रुपये व आ. यशोमती ठाकूर यांच्या निधीतून २० लक्ष रुपये असे एकूण ४० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.
देशमुख कुटुंबियांच्या सातव्या पिढीमधील हे मंदिर असून त्यांच्या सात पिढ्यांनी या मंदिरात सेवा केलेली आहे. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची दोनशे वर्षे जुनी प्रतिमा या मंदिरात असून देशमुख कुटुंबीय या मंदिराची मनोभावे सेवा करतात.पुरातन मंदिर असल्याने याठिकाणी भाविकांची गर्दी असते शिवाय रामनवमीला भोसलेकालीन रथामधून श्रीरामाची भव्य आणि डोळे दिपावणारी मिरवणूक आकर्षण ठरणारी असते.पुरातन मंदिर असल्याने भाविकांची गैरसोय व्हायची त्यामुळे येथील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व भाविकांनी आ. यशोमती ठाकूर यांच्याकडे प्रशस्त सभागृहाची मागणी केली होती. याबाबत मंदिराचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख,महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब देशमुख, राजेश बोडखे, नितीन हटवार, संजय चौधरी,आनंद लोहोटे, प्रा.मोरेश्वर इंगळे,भाऊराव कापडे, ज्ञानेश्वर बारस्कार, मुकुंद पांढरीकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर आ.यशोमती ठाकूर यांनी मंदिराच्या सभागृहासाठी तात्काळ त्यांच्या निधीमधून २० लक्ष रुपये मंजूर केले तसेच याबाबत खा. बळवंत वानखडे यांनी सुद्धा त्यांच्या निधीमधील २० लक्ष रुपये असे एकूण ४० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले.
प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता या सभागृहाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्याला खा.बळवंत वानखडे, आ.यशोमती ठाकूर शिवसेना नेत्या प्रीती बंड यांचेसह सरपंच कविता डांगे, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती असणार आहे.तरी भाविकभक्तांनी तसेच नागरिकांनी या भूमीपूजन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिराचे अध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांनी केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!