ग्रा.पं.नया अकोला ने पटकाविला प्रथम क्रमांक
टीबी मुक्त गाव पुरस्काराने नया अकोला ग्रा.पं.सन्मानित
सरपंच-सचिव व सदस्यांचे संयुक्तिक प्रयत्न
●मिररवृत्त
●अमरावती
विविध उपक्रमांना राबवून गावाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या नया अकोला ग्रामपंचायतने टीबीमुक्त गाव अभियानात सहभागी होऊन आरोग्य विभागाचा प्रथम क्रमांक पटकाविला.नया अकोला येथील कर्तव्यदक्ष सरपंच,सचिव आणि ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रितपणे गाव टीबीमुक्त करण्यासाठी केलेल्या कार्याची ही पावती असल्याचे सरपंच सुजाता रणजित तिडके यांनी यावेळी म्हटले.
ग्रामपंचायतच्या वतीने गावातील गोरगरीब, शेतकरी, महिला, निराधार, तसेच गरजू घरकुल लाभार्थ्यांना घरकुल आवास योजनेचा लाभ देऊन घरकुल योजनेत सुद्धा प्रथम क्रमांक पटकाविला आहे.गावात नाली, रोड, पथदिवे, नळाच्या पाण्याचे व्यवस्थापन, स्वच्छता, अंगणवाडी, तसेच शाळेतील आवश्यक त्या कार्याकडे सरपंच यांनी प्राधान्य दिले.अनेक विकासकार्य येत्या काही दिवसात पूर्ण होणार असून काही कामे तांत्रिक अडचणींमुळे रखडले असल्याची खंत सुद्धा सरपंच सुजाता तिडके यांनी व्यक्त केली.
अमरावती येथे टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानाच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात सरपंच सुजाता तिडके, सचिव मनिषा बदुकले, रणजित तिडके यांचे अभिनंदन करून पुरस्कार वितरण करण्यात आले.प्रशस्तीपत्र,महात्मा गांधी यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन नया अकोला ग्रामपंचायतचा यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी अधिकारी ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.