जेष्ठ साहित्यिक तथा विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन
●वसईत नंदाखाल येथे राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
●साहित्य जगतावर शोककळा
●मिररवृत्त
●आशिष राणे,वसई
मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक व विचारवंत,तथा हरित वसईचे प्रणेते वसई धर्मप्रांतातील फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वसईत नंदाखाल येथे राहत्या घरी गुरुवार दि.२५ जुलै २०२४ पहाटे ६ वाजता निधन झाले आहे.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज गुरुवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी (जेलाडी) त्यानंतर ४ वाजेपासून पवित्र आत्म्याचे चर्च, नंदाखाल येथे अंत्यदर्शन घेता येईल. तर त्यांचा
अंत्यविधी मिस्सा – विधी गुरुवार दि २५ जुलै २०२४ रोजी, संध्याकाळी ६.०० वाजता पवित्र आत्म्याचे चर्च, नंदाखाल येथे होईल.
अशी माहिती बिशप हाऊस वसई चे फादर बर्नाड फर्नांडिस यांनी दिली फादर दिब्रिटो यांच्या निधनाने एकूणच साहित्य जगतावर शोककळा पसरली आहे.