शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
•मिररवृत्त
•अमरावती प्रतिनिधी
श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित रामकृष्ण महाविद्यालय दरापूर येथे “शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा” संपन्न
रामकृष्ण महाविद्यालय दारापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना, भूगोल व समाजशास्त्र विभागाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली या मार्गदर्शन कार्यशाळेचे अध्यक्ष प्रा. पी.आर.एस. राव (सचिव श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती) प्रमुख अतिथी प्रा. सचिन पंडित (प्रशासकीय अधिकारी श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती) प्रमुख वक्ते डॉ. जितेंद्र दुर्गे (श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती) व रुपेश कडू (सेंद्रिय शेती मार्गदर्शक) हे उपस्थित होते. डॉ. यशवंत हरणे यांनी कार्यशाळा आयोजना मागील उद्देश सांगून प्रास्ताविक केले.
डॉ. जितेंद्र दुर्गे यांनी आपल्या मार्गदर्शनात तूर, कपाशी व सोयाबीन या तीन पिकांची लागवड आधुनिक पद्धतीने कशा प्रकारे करता येईल व ते केल्यावर आपल्याला कोणत्या प्रकारचे फायदे होतात व उत्पन्न कसे वाढेल याबाबत सखोल मार्गदर्शन केले. रुपेश कडू यांनी शेतीचा कर्ज कमी करण्यासाठी सेंद्रिय शेती हा एक चांगला पर्याय तसेच सेंद्रिय शेती करताना फक्त थोडी मेहनत जास्त घ्यावी लागते आणि खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होते हे स्पष्ट करून दाखवले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.राव यांनी आपल्या मार्गदर्शनात शेती आणि शेतीमध्ये होणाऱ्या आधुनिक प्रयोग याचा कशाप्रकारे फायदा होईल जेणेकरून आपण समृद्ध जाऊ याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संचालन डॉ. प्रकाश मस्के यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. संदीप हाडोळे यांनी केले. या कार्यशाळेसाठी दारापूर व आजूबाजूच्या गावातील जवळपास 42 शेतकरी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. कुंदन अलोने व सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.