गुरू ग्लोबल स्कुल मध्ये’विठ्ठल नामाची शाळा’भरली
●आषाढी एकादशीनिमित्य कार्यक्रमाचे आयोजन
●मिररवृत्त
●नांदगाव पेठ
येथील गुरू ग्लोबल स्कुल मध्ये आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुख्मिणी तसेच वारकऱ्यांची वेशभूषा करून शाळेच्या परिसरातून दिंडी काढली.यावेळी ज्ञानोबा-माउली तुकारामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.
दीपप्रज्वलन, विठ्ठल पूजनाने व पालखीचे पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली झाली. या बाळ गोपाळांच्या दिंडीत विद्यार्थ्यांनी नृत्य, रिंगण, फुगडी खेळणे सादर केले.छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या वेषभूषामुळे अनेकांनी पंढरपूरचा सोहळा शाळेत अनुभवला.विद्यार्थ्यांना अध्यात्मिक गोडी निर्माण व्हावी यासाठी मुख्याध्यापक अश्विनी मानेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी संपूर्ण परिसर हा विठ्ठलमय झाला होता.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षिका कु.भाग्यश्री भगत, अंजली खेकरे, अंकिता पाटोळे, भटकर मॅडम, अश्विनी मानेकर, अविनाश शिंदे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.