spot_img

डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या सहा शिक्षकांना आचार्य पदवी

डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या सहा शिक्षकांना आचार्य पदवी

◆मिररवृत्त
◆अमरावती

डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती येथे तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या सहा प्राध्यापकांना आचार्य पदविने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे झालेल्या दीक्षांत समारंभात डॉ.हिना देसाई, डॉ .लक्ष्मी परिहार(पवार),डॉ.रेणुका तळोकार,डॉ.रत्नाकर बनसोड, डॉ. कीर्ती मालपाणी,डॉ. अपेक्षा भूंबर यांना आचार्य पदविने सन्मानित करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीचे उपाध्यक्ष प्रा. दिपक कुमार श्रीवास्तव, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.आर.एम. कडू, डॉ.आर.डी. सिकची, डॉ.व्ही.एच. नागरे, डॉ.एच.एम. धुर्वे, डॉ. मोना चिमोटे, डॉ.यु.बी. काकडे, सौ. मोनाली तोटे पाटील, डॉ. नितीन कोळी, डॉ.व्ही.एम. मेटकर, श्री.ए.एम. बोर्डेे, प्रो. अनुपमा कुमार, डॉ. वैशाली गुडधे, डॉ.डी.डब्ल्यु. निचित, डॉ. तनुजा राऊत, डॉ.व्ही.आर. मानकर आदी उपस्थित होते.
विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी पीएचडी प्राप्त सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल पीएचडी प्राप्त सर्वांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!