अमरावती तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक
महोत्सवाला शानदार सुरुवात
■ ६०० खेळाडू व शिक्षकांचा सहभाग
■ चिमुकल्यांच्या निदर्शनाने उपस्थितांचे मने जिंकली
●मिररवृत्त
◆अमरावती
अमरावती पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन शिक्षणाधिकारी प्रफ्फुल कचवे यांचे हस्ते शासकीय माध्यमिक कन्या विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी डॉ. प्रफ्फुल भोरखडे हे होते. प्रमुख उपस्थिती शिक्षणाधिकारी ( योजना) अब्दुल राजीक, गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे, शिक्षण विस्तार अधिकारी संदीप बोडखे, अजित पाटील, अनिल डाखोळे सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, केंद्रप्रमुख आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक व मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण केले. तसेच क्रीडा ज्योत पेटवून व क्रीडाध्वजाचे ध्वजारोहण करून रीतसर उदघाटन केले.यावेळी टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळविणाऱ्या आनंदी वानखडे व गायत्री भुसारी या विद्यार्थीनीचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले
दोन दिवसीय क्रीडा महोत्सवात सांघिक खेळात कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल,टेनक्वाईट, बॅडमिंटन, लंगडी या खेळांचा तर वैयक्तिक खेळात धावणे, लांब व उंच उडी, दोरीवरील उड्या, कुस्ती, गोळाफेक इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आला आहे. उद्घघाटनिय कबड्डीचा सामना खानापूर व नांदुरा लष्करपूर या संघात झाला.यावेळी चिमुकल्यांचे निदर्शने क्रीडा महोत्सवाचे आकर्षण ठरले.
दरम्यान, खेळाडू व पंच यांना श्री. उमक सरांनी शपथ दिली.क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध समितीप्रमुख व सभासद अथक परिश्रम घेत आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे यांनी केले. संचालन डॉ. ज्ञानेश्वर मोहोड यांनी तर आभार गटसमन्वयक सुरेंद्र मेटे यांनी मानले.असे या कार्यक्रमाचे प्रसिध्दी समितीचे विनायक लकडे यांनी कळविले आहे.
◆चिमुकल्यांची निदर्शने आकर्षण ठरली◆
या महोत्सव दरम्यान नांदुरा, भानखेड खु., डवरगाव, काटआमला व वडद येथील शाळांनी निदर्शनाचे सादरिकरण केले. चिमुकल्यांच्या निदर्शने व नृत्यानी उपस्थितांची मने जिंकली