धर्मा वानखडे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम रत्न अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित
●मिररवृत्त
●अमरावती
सहारा चॅरिटेबल ट्रस्ट उत्तर प्रदेश हे अनेक वर्षांपासून सामाजिक व आरोग्य,शिक्षण, ग्रामीण विकास क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बाबत,मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम रत्न अवॉर्ड ने सन्मानित करत असतात.नीती आयोग,मिनिस्टरी ऑफ मायक्रो अँड स्मॉल मिडीयम एन्टरप्राइज,अमेरिकन मेरिट कॉन्सिल आणि आयएसओ प्रमाणित हा पुरस्कार दिला जातो.
अमरावती येथील आरोग्य विभागात आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत असणारे धर्मा वानखडे यांना आरोग्य क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाचा या वर्षीचा आरोग्यरत्न पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे व आरोग्यविषयक निर्माण केलेल्या फिल्म्स क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल आणि ह्युमन राईट्स कॉन्सिल ऑफ इंडिया च्या माध्यमातून सामाजिक चळवळ राबवित असल्याबाबत सामाजिक,व आरोग्य क्षेत्रात विशेष योगदानाबद्दल त्यांना या वर्षीचा हा प्रतिष्ठित पुरस्कार दिल्या गेला असल्याचे सहारा चॅरिटेबल ट्रस्ट चें राष्ट्रीय अध्यक्ष अखलाक अहमद यांनी सांगितले
धर्मा वानखडे यांनी नोकरी सांभाळून भारतीय मानवाधिकार परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रहित व जनहिताचे कार्य करत,भ्रष्ट्र व्यवस्थेविरुद्ध,अन्यायाविरुद्ध आवाज उठवून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत व आरोग्य विषयक फिल्म निर्मिती करून समाजात जागरूकता निर्माण करीत आहेत.त्यांच्या या नामांकित असलेल्या मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम रत्न अवॉर्ड 2023 या पुरस्काराने अजून पुन्हा पुरस्कारात भर पडली असून त्यांचे सर्वच स्तरावर त्यांचे कौतुक होत आहे.