spot_img

दहा वर्षापूर्वी बांधलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत शिकस्त व धोकादायक कशी?

दहा वर्षापूर्वी बांधलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत शिकस्त व धोकादायक कशी?
बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्या इंजिनियर्सच्या संपत्तीतून नुकसानाच्या वसुलीसाठी अरुण शेवाणे बसणार आमरण उपोषणासाठी.

मिररवृत्त
चेतन हिंगे/अंजनगाव सुर्जी

कापुसतळणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन २०१३ मध्ये झाले होते. चार-पाच वर्षांपासूनच इमारत खूप जुनी दिसत होती. म्हणजेच इमारतीच्या भिंतींना जागोजागी भेगा पडणे, पावसाळ्यात छत गळणे, भिंतींना लावलेल्या स्टाईल्स खाली पडणे, तर खालच्या स्टाईल्स उखडल्याने नासधुस होणे, तावदाण्या तुटणे, कपाटाची दारं पडणे, इत्यादी कारणामुळे सदर इमारत बांधकाम साहित्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याचे लक्षात आणण्याकरिता प्रहार चे उपतालुका प्रमुख अरुण शेवाणे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे २०१८ पासून निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घेऊन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती यांच्याकडे सदर इमारतीच्या दर्जाबाबत शिफारस केली. त्या अनुषंगाने सदर इमारती ही शिकस्त, बांधकाम धोकादायक व वास्तव्यास योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्या अनुषंगाने दवाखाना दुसऱ्या ठिकाणी तात्काळ स्थलांतर केला.
इमारतीचे आयुष्य कमीत कमी ३० वर्षाचे आहे. असे असताना सुद्धा सदर इमारतीला पाच- सहा वर्षातच अवकळा येत असल्याचा अहवाल प्राप्त असून सुद्धा संबंधित इंजिनियर्स वर निलंबनाची कारवाई होत नसेल आणि झालेल्या पैशाच्या नुकसानाची भरपाई त्यांच्या संपत्तीतून होत नसेल तर हे जनतेच्या पैशाची खुल्लेआम लूट होत असल्याचा आरोप तक्रार कर्ते अरुण शेवाणे यांनी केला आहे. संबंधित इंजिनियर्स ला निलंबित करून त्यांच्या संपत्तीतून नुकसानाची रक्कम वसूल करण्यासाठी चार-पाच वेळा निवेदन देऊन कारवाई होत नसल्यामुळे आणि जनतेच्या पैशाची होत असलेली नासधुस थांबण्याच्या दृष्टिकोनातून दि.३०/११/२०२३ ला अन्नत्याग उपोषणाला बसणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग , जिल्हा आरोग्य अधिकारी, इत्यादींना निवेदन देऊन अन्नत्याग उपोषणाचा इशारा निवेदन देऊन दिला आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!