spot_img

कापूसतळणी परिसरातील प्रमूख रोड झाले खड्डेमय

कापूसतळणी परिसरातील प्रमूख रोड झाले खड्डेमय
प्रशासन झोपेत

मिररवृत्त
चेतन हिंगे/कापुसतळणी

कापूसतळणी परीसरात सर्व प्रमूख रोड हे पूर्ण पणे खराब झाले असून प्रत्येक रोड ने वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे..
परिसरातील रोड चे दुरुस्तीचे काम है काही देवसा पूर्वी करन्यात आले होते. दुरुस्ती दरम्यान ज्या ठिकाणीं खड्डा आहे त्या ठिकाणीं डांबर टाकून तो खड्डा भुजवण्यात आला होता. परंतू खड्डा भुजवतांना त्या ठिकाणीं उंचवटा तयार झालेला दिसतो. आणि पुन्हा रोड ने गाडी चालवताना खड्याच्या ठिकाणीं उंचवटातयार अस्ल्या मुळे तोच त्रास होत आहे..
परिसरातून कापूसतळणी ते अंजनगाव सूर्जी… कापूसतळणी ते कोकर्ड्रा.. कापूसतळणी ते जवळा.. है प्रमुख रोड जातात त्याच प्रमाणे अंजनगाव ते अमरावती खल्लर मार्गे जाणारा रोड सुद्धा या मधे आहे. परंतू रोड अतिशय खराब झाल्या मुळे यावरील वाहतूक हे लांब पल्याने जात आहे किव्वा त्यांना जावे लागत आहे.
झालेल्या रोड ची दुरुस्ती पाहून तपासणी करून योग्य रित्या दुरुस्ती करावी किव्वा त्यावर नविन रोड बनवावा अशी मागणी परिसरातील नागरीक करत आहे..

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!