नया अकोला येथे शेतकरी पुत्रांच्या कबड्डी स्पर्धेला थाटात प्रारंभ
कबड्डीपटू रोशन तुळे, गौरव जोगे यांच्या हस्ते सामन्यांचे उदघाटन
दीपक क्रीडा मंडळाचे नेत्रदीपक आयोजन
अमरावती/प्रतिनिधी
नजीकच्या नया अकोला येथील जि.प. शाळेच्या प्रांगणात शुक्रवारपासून शेतकरी पुत्रांच्या कबड्डी स्पर्धेला थाटात प्रारंभ झाला.दीपक क्रीडा मंडळाच्या वतीने या कबड्डी स्पर्धेचे नेत्रदीपक आयोजन करण्यात आले असून ग्रामीण भागातील मातीत खेळून राज्यस्तरावर दमदार कामगिरी करणाऱ्या नांदगाव पेठ येथील कबड्डीपटू रोशन तुळे आणि गौरव जोगे यांच्या हस्ते या कबड्डी सामन्यांचे उदघाटन पार पडले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून येथील माजी कबड्डीपटू दयाराम भोरे यांची उपस्थिती होती.दीपप्रज्वलाने या स्पर्धेचे सुरुवात झाली. कबड्डी स्पर्धेचे मार्गदर्शक तथा माजी जि.प. सदस्य प्रकाश साबळे यांनी प्रास्ताविकेमधून कबड्डी आयोजनामागील रूपरेषा विषद केली. तसेच प्रकाश साबळे व दिनेश विघे यांच्या कडून कबड्डी पटू यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेसाठी जिह्यातील शेतकरी पुत्रांच्या चमू मोठ्या संख्येने दाखल झाल्या होते. पहिल्यांदा केवळ शेतकरी पुत्रांचे कबड्डी सामने असल्याने अनेकांना या स्पर्धेची उत्सुकता होती. जिल्ह्यातील हजारो कबड्डीप्रेमी या सामन्याला उपस्थित होते. यावेळी सरपंच सौ सुजाता तिडके, माजी सरपंच प्रशांत विघे,मनोहरराव निर्मळ,वामनराव भोरे, अरुणराव हिवे, प्रफुल भोरे,रंजीत तिडके, मुकुंदराव धस्कट, रवींद्र वानखडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सामन्यांच्या यशस्वीतेसाठी
दीपक क्रीडा मंडळाचे प्रज्वल भोरे, धम्मपाल बोके, विनोदराव गोरे,निलेश बारबुद्धे,अक्षय तायडे अक्षय साबळे, सौरभ विघे, अजय सपाटे, सुरज चव्हाण, शेखर विघे, शाम तिडके,यश मेश्राम, तेजस लुंगे,तेजस रामेकर, मंथन मेश्राम व सहकाऱ्यांचे भरीव सहकार्य लाभले.