पारंपरिक व आधुनिक वेशभूषा चा संगमाने विद्यार्थ्यांनी साजरा केला बालदीन
एकायन इंग्लिश स्कूल, असदपुर येथे बालदिनानिमित्त वेशभूषा सादरीकरण संपन्न
•मिरर वृत्त
•असदपूर प्रतिनिधी
असदपुर येथील एकायन इंग्लिश स्कूलमध्ये बालदिनाचे औचित्य साधून वेशभूषा सादरीकरण चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी विविध , ऐतिहासिक, सांस्कृतिक तसेच आधुनिक वेशभूषांमध्ये भाग घेतला. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि कल्पकतेला पाहता, सर्वांनी आपापली वेशभूषा अत्यंत आकर्षक आणि मनोरंजनपर केली होती.
या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषेत सहभाग घेतला आणि उत्कृष्ट कामगिरी केली, ज्यामुळे त्यांना सांस्कृतिक प्रोत्साहन मिळाले
बालदिनानिमित्त आयोजित या स्पर्धेने सर्वच विद्यार्थ्यांना आनंद व उत्साह दिला, तसेच त्यांना विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक पात्रांच्या संदर्भात शिकण्याची संधी मिळाली. या करीता एकायन इंग्लिश स्कूल च्या शिक्षिका कु. वैष्णवी ठाकरे, कु. शिवानी ठाकूर आणि कु. नियती तायडे यांनी पुढाकार घेतला तसेच स्कूल च्या संचालिका डॉ.स्मिता तायडे यांचे मार्गदर्शनात लाभले.