spot_img

तक्षशिला महाविद्यालय, दारापूर येथे वाचन प्रेर णा दिन साजरा

तक्षशिला महाविद्यालय, दारापूर येथे वाचन प्रेर
णा दिन साजरा
•मिरर वृत्त
•अमरावती प्रतिनिधी तक्षशिला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. हा विशेष दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. वाचन प्रेरणा दिनाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देणे हा आहे.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली, ज्यामध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. करिअर कौन्सिलिंग सेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गायडन्स सेल आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने एक विशेष ग्रंथ समीक्षण स्पर्धा आयोजित करण्यात आली.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या पुस्तकांवर समीक्षण लिहून आपले विचार मांडले. परीक्षकांच्या निरीक्षणानुसार, यश पवार याने प्रथम क्रमांक पटकावला, मनस्वी वानखडे हिला द्वितीय क्रमांक मिळाला, तर पायलला तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना यथोचित पारितोषिक देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील करिअर कौन्सिलिंग सेलचे समन्वयक यशवंत हरणे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाच्या महत्त्वाबद्दल मार्गदर्शन करताना डॉ. कलाम यांच्या विचारसरणीचे उदाहरण दिले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत खेडकर यांनी अतिशय प्रभावीपणे केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मल्लू पौडवाल सर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना त्यांनी डॉ. कलाम यांचे जीवन समर्पण, साधेपणा, आणि प्रामाणिकतेचे उदाहरण म्हणून पाहावे असे सांगितले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री पवन शर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!