श्रीरामचंद्र संस्थानने हिंदुत्व आणि संस्कृती जोपासली-आ. यशोमती ठाकूर
●४० लक्ष रुपयांच्या सभागृहाचे भूमिपूजन
●मिररवृत्त
मंगेश तायडे/नांदगाव पेठ
धार्मिक संस्थाने संस्कृतीचे खरे रक्षक असतात आणि या धार्मिक संस्थांनांमधूनच भारतीय परंपरा, संस्कृती आणि धर्माचा प्रसार होतो. हिंदू संस्कृतीला हजारो वर्षांच्या इतिहास आहे आणि या इतिहासाची साक्ष असलेले नांदगाव पेठ मधील श्रीरामचंद्र संस्थान दोनशेपेक्षा अधिक वर्षांपासून प्रखर हिंदुत्व आणि संस्कृती जोपासत आहे हे संस्थान खऱ्या अर्थाने धर्माचे रक्षक असल्याचे प्रतिपादन आ. यशोमती ठाकूर यांनी केले. शुक्रवारी श्रीरामचंद्र संस्थानच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्य आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, आपल्या अंतःकरणातील श्रीरामाचे आपण नामस्मरण करतो,त्यांना पूजतो तसेच इतरांच्या अंतःकरणातील रामाचे सुद्धा आपण नामस्मरण केले पाहिजे हा विचार कुठेतरी आपल्यामध्ये यायला पाहिजे तरच आपण प्रभू श्रीरामांचे विचार घरोघरी पोहचवण्यात यशस्वी होऊ असेही त्या म्हणाल्या.खासदार आणि आमदार यांच्या संयुक्त निधीमधून ४० लक्ष रुपये सभागृहासाठी मंजूर करण्यात आले. त्यानिमित्त श्रीरामचंद्र संस्थान च्या वतीने आयोजित या भूमीपूजन सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खा. बळवंत वानखडे हे उपस्थित होते तर उदघाटक म्हणून श्री संत सचिनदेव महाराज अमरावती,श्याम महाराज चौबे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ.यशोमती ठाकूर,शिवसेना नेत्या प्रीती बंड,कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सभागृहाचे भूमीपूजन झाल्यानंतर मान्यवरांनी आपापली मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीरामचंद्र संस्थानचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांनी केले. ते म्हणाले की,श्रीरामचंद्र संस्थानला दोनशे वर्षांची परंपरा असून आमच्या कुटुंबातील सातवी पिढी या मंदिराची मनोभावे सेवा करत आहे. याठिकाणी असंख्य भाविक येतात मात्र जागेची कमतरता असल्यामुळे भाविकांची गैरसोय होत होती. गावकरी आणि आणि गावातील मान्यवर मंडळींना घेऊन आ. यशोमती ठाकूर यांच्याकडे सभागृह बांधून देण्याची विनंती आम्ही केली आणि यशोमती ठाकूर यांनी तातडीने निधी मंजूर केला त्यामुळे खा. बळवंत वानखडे आणि आ. यशोमती ठाकूर यांचे श्रीरामचंद्र संस्थानच्या वतीने आभार व्यक्त करत त्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला ऍड. अमित गावंडे, दिलीप सोनोने, गजानन देशमुख,बाळासाहेब देशमुख,माजी जि प सदस्य नितीन हटवार , राजेश बोडखे,प्रा. मोरेश्वर इंगळे, सुमित कांबळे, सरपंच कविता डांगे, विनोद डांगे, पंकज शेंडे,चंदू राऊत,अरुण राऊत,संजय नागोणे,ग्रामपंचायत सदस्य वृषाली इंगळे, गोलू नागापुरे,राजन देशमुख, नवलकिशोर मालपाणी, संजय चौधरी, निलेश जामठे,भाऊराव कापडे,बाळासाहेब भुस्कडे, नंदू कुकडे, विनोद रंधवे, विपुल पालिवाल,उदय चंदेल,संदीप यावले, मुकुंद यावले,शशी बैस, गजानन शेंदरकर यांचेसह गावकरी मंडळी व भाविक भक्त उपस्थित होते.
ऐतिहासिक मंदिराचे जतन केल्या जाईल-खा.बळवंत वानखडे
दोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या श्रीरामचंद्र संस्थानच्या ऐतिहासिक मंदिराचे जतन केल्या जाईल.प्रभू श्रीराम करोडो भक्तांचे आराध्य दैवत असून भक्तांच्या सोयीसाठी आणखी चांगल्या उपाययोजना करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे आश्वासन खा. बळवंत वानखडे यांनी यावेळी दिले.